शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
3
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
4
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
6
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
7
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
8
हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
9
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
10
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
11
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
12
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
13
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
14
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
15
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
16
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
17
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
18
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
19
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
20
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

'या टीचभर मदतीने शेतकरी उभा राहणार का?' शेतकऱ्याचा 'डोक्यावर उभा राहून' सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 16:29 IST

कर्जमाफी आणि वाढीव मदत कधी? शेतकऱ्याचा फडणवीस, पवार, शिंदेच्या बॅनरसमोर 'डोक्यावर उभा राहून' सरकारला सवाल

- नितीन कांबळेकडा (बीड): अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाल्यानंतर सरकारने जाहीर केलेली तुटपुंजी मदत आणि केवळ फोटोसेशन करून गेलेल्या नेत्यांविरोधात बीड जिल्ह्यातील एका नुकसानग्रस्त शेतकऱ्याने अनोखे आंदोलन छेडले आहे. 'या टीचभर मदतीने शेतकरी उभा राहणार का?' असा संतप्त सवाल उपस्थित करत या शेतकऱ्याने थेट शेतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे फोटो असलेले बॅनर लावून त्यांच्यासमोर चक्क डोक्यावर उभे राहून (शीर्षासन) आपल्या व्यथा मांडल्या.

आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथील अर्जुन शहादेव घोडके या शेतकऱ्याचे जोरदार पावसामुळे शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून, त्यांच्या शेताचा अक्षरशः 'मसनवाटा' झाला आहे. सरकारने शेतात येऊन पंचनामे केले आणि तुटपुंजी मदत जाहीर केली. मात्र, या लाखोंच्या नुकसानीसमोर ही मदत केवळ शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळण्यासारखी आहे, असा रोष व्यक्त होत आहे.

बॅनरसमोर शीर्षासन आणि लोंटागणशेतकरी अर्जुन घोडके यांनी आपला संताप व्यक्त करण्यासाठी शेतात शासनाच्या तीनही प्रमुख नेत्यांचे फोटो असलेले बॅनर लावले. या बॅनरसमोर त्यांनी पिकात लोंटागण घेतले आणि त्यानंतर डोक्यावर उभे राहून आपल्या व्यथा जगासमोर मांडल्या.

तातडीने कर्जमाफी करावीघोडके यांनी यावेळी, "लाखोचे नुकसान झाले असताना शासन टीचभर मदत करून शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळत आहे. सरकारने शेतकऱ्यांचा मोडलेला कणा पुन्हा ताठ करण्यासाठी वाढीव मदत तात्काळ जाहीर करावी आणि तातडीने कर्जमाफी करावी," अशी कळकळीची मागणी केली आहे. या अनोख्या आंदोलनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, शेतकऱ्यांची भीषण परिस्थिती यातून पुन्हा एकदा समोर आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Farmer protests meager aid with headstand, questions government apathy.

Web Summary : Frustrated by insufficient aid after crop loss, a farmer in Beed protested by performing a headstand in front of leaders' photos. He demands increased assistance and immediate loan waivers, highlighting the dire situation of farmers.
टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीfloodपूरBeedबीड