ट्रँक्टर उलटल्याने उसाखाली दबून २५ मेंढ्या दगावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 06:18 PM2021-01-14T18:18:12+5:302021-01-14T18:19:28+5:30

शहरापासून जवळच परभणी रोडवर हा अपघात घडला.

When the tractor overturned, 25 sheep were crushed under the sugarcane | ट्रँक्टर उलटल्याने उसाखाली दबून २५ मेंढ्या दगावल्या

ट्रँक्टर उलटल्याने उसाखाली दबून २५ मेंढ्या दगावल्या

googlenewsNext
ठळक मुद्देमाजलगाव शहराकडून जय महेश कारखान्याकडे एक डबल ट्रॉलीचे ट्रॅक्टर ऊस घेऊन जात होते.

माजलगाव : जयमहेश साखर कारखान्याकडे जाणारे एक ट्रँक्टर अचानक उलटल्याने त्यातील उसाखाली दबून २० ते २५ मेंढ्या दगावल्याची घटना गुरुवारी दुपारी साडेचार वाजता घडली. शहरापासून जवळच परभणी रोडवर हा अपघात घडला.  

याबाबत अधिक माहिती अशी की, माजलगाव शहराकडून जय महेश कारखान्याकडे एक डबल ट्रॉलीचे ट्रॅक्टर ऊस घेऊन जात होते. परभणी रोडवर हे ट्रॅक्टर अचानक उलटले. यावेळी रस्त्याच्या बाजूने माजलगावकडे जाणाऱ्या  २० ते २५ मेंढ्यां ट्रॅक्टरखाली दबल्या गेल्या. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दबलेल्या मेंढ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. २० ते २५ मेंढ्या एकाचवेळी दगावल्याने मेंढपाळाचे मोठे नुकसान झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: When the tractor overturned, 25 sheep were crushed under the sugarcane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.