सडका भाजीपाला उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:22 AM2021-06-21T04:22:11+5:302021-06-21T04:22:11+5:30

---------------------------- झाडांच्या फांद्या छाटण्याची मागणी अंबेजोगाई : शहरातील काही रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात झाडांच्या फांद्या आहेत. या फांद्यामुळे अपघात ...

When the street is open to vegetables | सडका भाजीपाला उघड्यावर

सडका भाजीपाला उघड्यावर

Next

----------------------------

झाडांच्या फांद्या छाटण्याची मागणी

अंबेजोगाई : शहरातील काही रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात झाडांच्या फांद्या आहेत. या फांद्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रस्त्यांवरील झाडांच्या फांद्या तोडण्याची मागणी केली जात आहे.

----------------------------

खासगी शिक्षकांची चिंता वाढली

अंबेजोगाई : शहरात मोठ्या संख्येने इंग्रजी शाळा आहेत. या शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षक शिकविण्यासाठी जातात. यातून त्यांना रोजगार मिळाला आहे. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे या शिक्षकांना आता वेतन मिळणार की नाही, ही चिंता सतावत आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षभरापासून शाळा बंद आहे. अशा वेळी काही संस्था चालकांनी वेतन दिले आहे. मात्र, काहींना काहीच मिळाले नसल्यामुळे त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

------------------------------

घर दुरुस्तीची कामे खोळंबली

अंबेजोगाई : पावसाळा सुरू झाला आहे. असे असतानाही कोरोनाच्या संकटामुळे अद्यापही ग्रामीण, तसेच शहरी भागामध्ये घर दुरुस्तीच्या कामांना वेग आला नाही. घर दुरुस्तीसाठी लागणारे साहित्यच मिळत नसल्याने नागरिकांचा नाईलाज झाला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी शहरात येणे अडचणीचे झाल्याने, या वर्षी घर दुरुस्तीचे काम रखडणार, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

------------------------ ---

कोंडवाड्यांची दुरुस्ती करावी

अंबेजोगाई : शहरातील कोंडवाड्याची स्थिती दयनीय झाली असून, जनावरांच्या सुरक्षेचाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे कोंडवाड्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे. कोंडवाड्यात अनेक जनावरे ठेवण्यात येतात. मात्र, दुरवस्था असल्याने धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

-----------------------------

रखडलेले बांधकाम त्वरित करावे

अंबेजोगाई: कोरोनामुळे लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले आहे. लॉकडाऊनपूर्वी ज्या अत्यावश्यक कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. ती कामे लॉकडाऊनमुळे रखडली होती. आता निर्बंध शिथील करण्यात आले असल्याने, ग्रामीण भागातील रखडलेले कामे सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.

Web Title: When the street is open to vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.