शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता कधी असते, कधी नसते; पण सत्ता, पद गेले की अनेकांचा चेहरा पडतो: शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 13:02 IST

गेवराईत शिवाजीराव पंडित अभीष्टचिंतन सोहळा

- सखाराम शिंदेगेवराई (जि. बीड) : सत्ता कधी असते, कधी नसते. पण सत्ता, पद गेले की काहींचा चेहरा पडतो. परंतु शिवाजीराव पंडित यांचे तसे नाही. त्यांनी बीड जिल्ह्यात अनेक पदे भोगली. ४० वर्षे जनतेला भरभरून दिले. सेवाभावी वृत्तीने काम केले. ही बीड जिल्ह्याच्या दृष्टीने भूषणावह बाब आहे. स्वत:हून त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली. यानंतरही ते शेतीत रमले. राजकारणात पंडित घराण्याचा मोठा वारसा आहे. यामुळे आगामी काळात त्यांच्या पाठीशी उभे रहा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी केले.

गेवराई येथे माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभीष्टचिंतन सोहळा रविवारी (९ ऑक्टोबर) पार पडला. यावेळी शिवाजीराव पंडित यांचा खासदार शरद पवार, मंत्री रावसाहेब दानवे व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शरद पवार बोलत होते. आज आनंदाने या सोहळ्यासाठी सर्वजण एकत्र आले आहेत. बीडमध्ये १९८० मध्ये एखादी जागा सोडली तर माझ्या सर्व जागा निवडून आल्या होत्या. आज सुंदरराव सोळंके, गोविंदराव डक, बाबूराव आडसकर आपल्यात नाहीत. त्या काळात त्यांनी माझ्याबरोबर काम केले. या मंडळींनी राज्याच्या राजकारणात मला मनापासून साथ दिली. त्यात एक महत्त्वाची व्यक्ती शिवाजीराव पंडित हेही होते. १९८५ मध्ये शिवाजीराव पंडित यांच्यावर जिल्हा परिषदेची जबाबदारी टाकली होती. ती त्यांनी पेलली. त्या काळात दुष्काळ होता. त्यात सर्वात आधी बीडचे नाव असायचे. दुष्काळात त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मदत केली. जायकवाडीचे पाणी गेवराईला आणले, असे पवार यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते, अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री संदीपान भुमरे, राजेश टोपे, श्रीनिवास पाटील उपस्थित होते.

एकदा ठरविले की बीडकर ते पूर्ण करतातगेवराईत शिवाजीराव पंडित यांनी जयभवानी सहकारी साखर कारखाना उभा केला. शैक्षणिक संस्थांचे जाळे उभे केले. आजही शेतीतून काळ्या आईची सेवा करीत आहेत याचा मला आनंद आहे. बीडचे वैशिष्ट्य असे आहे की एकदा ठरविले की ती गोष्ट येथील लोक पूर्ण करतात, असेही शरद पवार म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारBeedबीड