काळ्या बाजारात जाणारा गहू, तांदूळ पोलिसांनी पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:23 IST2021-06-17T04:23:44+5:302021-06-17T04:23:44+5:30

माजलगाव : काळ्याबाजारात विक्रीसाठी जाणारा रेशनच्या गहू-तांदळाचा टेम्पो पोलिसांनी पकडला. ही कारवाई बुधवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास करण्यात ...

Wheat and rice were seized by the police | काळ्या बाजारात जाणारा गहू, तांदूळ पोलिसांनी पकडला

काळ्या बाजारात जाणारा गहू, तांदूळ पोलिसांनी पकडला

माजलगाव : काळ्याबाजारात विक्रीसाठी जाणारा रेशनच्या गहू-तांदळाचा टेम्पो पोलिसांनी पकडला. ही कारवाई बुधवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास करण्यात आली. दरम्यान, पंचनामा करण्यासाठी पोलिसांकडून महसूल अधिकाऱ्यांना अनेक वेळा बोलावण्यात आले होते; परंतु संबंधित महसूल अधिकाऱ्यांनी तीन तास टाळाटाळ केल्याने संशय व्यक्त केला जात आहे.

माजलगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात धान्याचा काळाबाजार होत असल्याची ओरड नेहमीच कानावर येते. बुधवारी संध्याकाळी ६ वाजता काळ्याबाजारात विक्रीसाठी गहू-तांदूळ घेऊन टेम्पो जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावेळी पोलिसांनी पाठलाग करून बायपास रोडवर संबंधित टेम्पोची झाडाझडती घेतली. यावेळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तांदळाचे शंभर व गव्हाचे शंभर पोते असल्याचे सांगितले.

या कारवाईचा पंचनामा करण्यासाठी पोलिसांनी संबंधित विभागाचे पुरवठा अधिकारी एस.टी. कुंभार व नायब तहसीलदार अशोक भंडारे यांना अनेकदा फोन करून बोलावले; परंतु ते रात्री ९ वाजेपर्यंत आले नसल्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी सांगितले. याबाबत पुरवठा अधिकारी एस.टी. कुंभार यांना विचारले असता या बाबतीत मला काहीच माहिती नाही असे म्हणत टाळाटाळ केली.

Web Title: Wheat and rice were seized by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.