शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या दाखल्यांवर शेरा काय असणार? मुख्याध्यापकांसह विद्यार्थी-पालक संभ्रमात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:20 IST

बीड : दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता दाखले काढण्यासाठी पालक-विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली आहे. मात्र दाखल्यावर परीक्षेचा तारीख कुठली ...

बीड : दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता दाखले काढण्यासाठी पालक-विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली आहे. मात्र दाखल्यावर परीक्षेचा तारीख कुठली आणि शेरा काय द्यायचा, याबाबत अद्यापपर्यंत कुठल्याच सूचना नसल्याने मुख्याध्यापकांमध्ये सध्या संभ्रम आहे. तर दाखल्यावर शाळा सोडण्याचे कारण म्हणून कोणता शेरा येणार, याबाबत पालक आणि विद्यार्थीदेखील प्रतीक्षा करीत आहेत. परीक्षेच्या तारखेचा व निकालाचा महिना मार्च, एप्रिल, मे की जून याबाबत जवळपास सात हजार मुख्याध्यापकांनी परीक्षा मंडळाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधत मार्गदर्शन मागितले होते. दाखला देताना विद्यार्थ्याचे नाव, आसन क्रमांक, परीक्षेचा महिना याबाबत मंडळाचे परिपत्रक येईपर्यंत अनिश्चितता आहे. दोन- तीन दिवसांत ती दूर होईल, अशी आशा शाळांच्या मुख्याध्यापकांना आहे.

जिल्ह्यातील माध्यमिक शाळा -

दहावीतील एकूण विद्यार्थी -४०५४०

पास झालेले विद्यार्थी - ४०५२२

मुख्याध्यापक म्हणतात -

नववी आणि दहावीचे मूल्यमापन करून लागलेला निकाल व्यवस्थित व समाधानकारक आहे. प्रतिकूल परिस्थितीत शासनाने चांगला व योग्य निर्णय घेतला. बोर्डाकडून उपलब्ध झाल्यानंतर गुणपत्रिका व दाखला देण्यात येणार आहे. ही कागदपत्रे देताना कुठलीही अडचण येणार नाही.

- दिगंबर अंकुशे, मुख्याध्यापक, द्वा. मंत्री राजस्थानी विद्यालय, बीड.

------------

दाखला देण्याबाबत किंवा शेरा लिहिण्याबाबत कोणताही संभ्रम नाही. ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर ८-१० दिवसांत बोर्डाकडून गुणपत्रक येतील, त्यानंतर दाखले दिले जातात. दाखल्यावर निकालाचा शेरा उल्लेखाबाबत अडचण येणार नाही. - राजकुमार कदम, उपमुख्याध्यापक, श्री. शिवाजी विद्यालय, बीड.

------------

पालक म्हणतात...

कोरोनामुळे नववी आणि दहावीचे मूल्यांकन करून निकाल लागला आहे, तो योग्य वाटतो. पुढील शिक्षणासाठी शाळा सोडताना लागणाऱ्या दाखल्याबाबत पालक म्हणून कोणतीही शंका नाही. शासन व शाळा विद्यार्थ्याचे हित पाहूनच योग्य निर्णय घेतील. - शिवाजी सोनके, पालक, बीड.

--------

कोरोनाच्या परिस्थितीमुळे दहावी परीक्षेची मूल्यांकन पध्दत व निकाल योग्य राहिला. परंतु नेहमीप्रमाणे परीक्षा न झाल्याने विद्यार्थ्यांची काठिण्यपातळी सिद्ध होऊ शकली नाही. निकाल लागल्याने दाखला मिळणारच आहे. त्याबाबत पालक म्हणून कोणताही संभ्रम नाही. - अशोक हावळे, पालक, बीड.

------

अडचण येणार नाही

इयत्ता दहावीचा निकाल शिक्षण मंडळाच्या निर्णयानुसार मूल्यांकन करून लागला आहे. शाळा सोडताना दाखल्यावर शेरा काय लिहावा याबाबत बोर्डाकडून मार्गदर्शन होईल. त्यामुळे कोणत्याही शाळेला अथवा विद्यार्थ्याला अडचण येणार नाही. - डॉ. विक्रम सारूक, शिक्षणाधिकारी (मा.) बीड.

-------------