आष्टीत छत्रपती संभाजीराजे यांचे जंगी स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:22 IST2021-07-03T04:22:12+5:302021-07-03T04:22:12+5:30
मराठा आरक्षणप्रश्नी जनजागृती दौऱ्यानिमित्त कोल्हापूर संस्थानचे छत्रपती संभाजीराजे भोसले हे बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांचे शुक्रवारी आष्टी येथे ...

आष्टीत छत्रपती संभाजीराजे यांचे जंगी स्वागत
मराठा आरक्षणप्रश्नी जनजागृती दौऱ्यानिमित्त कोल्हापूर संस्थानचे छत्रपती संभाजीराजे भोसले हे बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांचे शुक्रवारी आष्टी येथे जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी आमदार बाळासाहेब आजबे, माजी आमदार साहेबराव दरेकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब लटपटे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश शिंदे, रामभाऊ खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय विश्रामगृह आष्टी येथे त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव, शिवप्रेमी उपस्थित होते. दरम्यान, धानोरा, कडा, आष्टी येथेही त्यांचे स्वागत झाले. यावेळी धानोरा येथे परमेश्वर शेळके यांनी ग्रामस्थांच्या वतीने स्वागत केले. तर कडा येथे सुनील नाथ, जगन्नाथ ढोबळे, भाऊसाहेब घुले, संदीप आस्वर, डॉ सुनील गाडे, डी. के कर्डिले, राम सावकार, सोमनाथ कर्डिले, ठकाराम दुधावडे, गणेश घावटे, विनोद पवार, बाळासाहेब महाडिक यांच्यासह कडा ग्रामस्थांनी स्वागत केले.
...
020721\img-20210702-wa0416_14.jpg