खासगी रुग्णालयांच्या दरनिश्चितीचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:23 IST2021-06-03T04:23:45+5:302021-06-03T04:23:45+5:30

.... मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे बीड : अहमदनगर जिल्ह्यात मे महिन्यात ० ते १८ वयोगटातील दहा हजार मुलांना ...

Welcome to the rates of private hospitals | खासगी रुग्णालयांच्या दरनिश्चितीचे स्वागत

खासगी रुग्णालयांच्या दरनिश्चितीचे स्वागत

....

मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे

बीड : अहमदनगर जिल्ह्यात मे महिन्यात ० ते १८ वयोगटातील दहा हजार मुलांना कोरोनाची लागण झाली होती. हा आकडा धक्कादायक आहे; परंतु या वयोगटातील मुलांची प्रतिकारशक्ती चांगली असल्याने ही मुले कोरोनामुक्त झाली. यामुळे काळजीचे कारण नाही; परंतु मुलांच्या आरोग्याची पालकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य प्रशासनाकडून होत आहे.

...

फाटक्या, जीर्ण नोटा व्यवहारात

बीड : जिल्ह्यात व्यवहारात १०, २०, ५० रुपयांच्या फाटक्या, जीर्ण नोटांचे प्रमाण वाढले आहे. या नोटांवरून अनेक वेळा वादाचे प्रसंग ओढवत आहेत. या नोटा बदलून मिळाव्यात, अशी मागणी होत आहे.

...

गॅरेज, ऑटो स्पेअरची दुकाने उघडण्याची मागणी

बीड : गेल्या दोन महिन्यांपासून गॅरेज, ऑटो स्पेअर पार्टची दुकाने बंद आहेत. अनेक दुचाकी, चारचाकी वाहनांचा वापर नसल्याने बंद आहेत. यामुळे ही वाहने दुरुस्तीला आली आहेत. अनेक वाहनांची गेल्या अनेक दिवसांपासून सर्व्हिसिंग झालेली नाही. तरी गॅरेज, ऑटो स्पेअर पार्टची दुकाने तातडीने उघडावीत, अशी मागणी होत आहे.

....

अकरावी प्रवेशाकडे पालकांचे लक्ष

बीड : दहावीचा निकाल लागला आहे. यामुळे आता विद्यार्थी, पालकांना अकरावी प्रवेशाचे वेध लागले आहेत. अकरावी प्रवेशाबाबत येत्या आठ दिवसांत निर्णय होणार आहे. याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. तरी अकरावी प्रवेशाबाबत सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.

...

आषाढी वारीसाठी बस सुरू करा

बीड : २० जुलै रोजी आषाढी यात्रा आहे. यासाठी वारकऱ्यांचे पंढरपूरच्या आषाढी वारीकडे लक्ष आहे. मागील वर्षीही आषाढी वारीला जाता आले नाही. यावर्षीही वारी हुकते की काय? अशी चिंता वारकऱ्यांना लागली आहे. तरी आषाढी वारीसाठी बससेवा सुरू करावी, अशी मागणी होत आहे.

....

पिंपरखेड परिसरात हलका पाऊस

धानोरा : आष्टी तालुक्यातील धानोरा, हिवरा, पिंपरखेड परिसरात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. दरम्यान, शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीची तयारी पूर्ण केली आहे. यासाठी शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

...

सलून दुकान उघडण्याची मागणी

कडा : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असल्याने गेल्या अनेक दिवसांपासून सलून दुकाने बंद आहेत. याचा मोठा फटका नाभिक समाजाला बसला आहे. आता कोरोनाचा प्रभाव कमी होत चालला आहे. त्यामुळे आठ दिवसांत सलून दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी नाभिक समाजाकडून होत आहे.

.....

Web Title: Welcome to the rates of private hospitals