धनंजय मुंडे यांचे शिरूर येथे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:23 IST2021-02-05T08:23:22+5:302021-02-05T08:23:22+5:30
यावेळी धनंजय मुंडेसोबत आ.बाळासाहेब आजबे, साहेबराव दरेकर, सतिष शिंदे, रामकृष्ण बांगर सोबत होते. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शेख महेबुब ...

धनंजय मुंडे यांचे शिरूर येथे स्वागत
यावेळी धनंजय मुंडेसोबत आ.बाळासाहेब आजबे, साहेबराव दरेकर, सतिष शिंदे, रामकृष्ण बांगर सोबत होते. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शेख महेबुब यांच्या सोबतीला राष्ट्रवादीची जुनी नवी फौज होती. पंधरा दिवसांपुर्वी त्यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले होते आणि काही दिवसांनी परत घेतले होते. धनंजय मुंडे या आरोपातून सुटले असल्याने त्यांच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व आले होते. संतांचा अशिर्वाद व जनतेचे प्रेम हीच आपली ताकद असल्याचे भावनिक उद्गार काढून आपण या ऋणातून मुक्त होऊ शकणार नसल्याचे सांगितले, तुमचे प्रेमच मला उर्जा देईल असेही यावेळी मुंडेंनी सांगितले. महेबुब शेख, तालुकाध्यक्ष विश्र्वास नागरगोजे, बाबूराव झिरपे, नशीर शेख ,धर्मा जायभाये ,सतिष बडे ,रवी आघाव ,किशोर जेधे ,अमोल चव्हाण खदीर शेख आदिंनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले .