शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

श्री गजानन महाराजांच्या पालखीचे प्रभू वैद्यनाथाच्या नगरीत स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 12:07 AM

श्री क्षेत्र शेगाव येथून आषाढी यात्रेसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे मंगळवारी सायंकाळी प्रभू वैद्यनाथांच्या परळीत आगमन झाले.

परळी (जि. बीड) : श्री क्षेत्र शेगाव येथून आषाढी यात्रेसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे मंगळवारी सायंकाळी प्रभू वैद्यनाथांच्या परळीत आगमन झाले. अ.भा.वारकरी मंडळाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे,तालुकाध्यक्ष विश्वांभर महाराज उखळीकर,नगरसेवक गोविंद मुंडे,सुरेश महाराज मोगरे,आशोक महाराज कराळेसह भाविकांनी पालखीचे स्वागत केले.या पालखीत आठशे वारकरी सहभागी झाले आहेत. थर्मलच्या ऊर्जानगर वसाहतीत ही पालखी दाखल झाली. न्यू हायस्कूल शाळेत या पालखीचा मुक्काम होता. पालखी आगमनापासून रात्री उशिरापर्यंत भाविकांची दर्शनासाठी रिघ लागली होती. उपस्थित लहान थोर भक्तांच्या मुखातून ‘जय गजानन’ ‘श्री गजानन’ असा जयघोष होत होता. यामुळे भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.बुधवारी सकाळी ही पालखी शहरात येणार असून संत जगमित्र नागा मंदिरात पालखीचा मुक्काम असणार आहे. मोंढा टॉवर, गणेशपार, अंबेवेस, वैद्यनाथ मंदिरमार्गे पालखी जगमित्र नागा मंदिरात विसावा घेणार आहे. तेथे दिवसभर भाविकांना दर्शन घेता येईल. गुरूवारी सकाळी कन्हेरवाडी मार्गे अंबाजोगाईकडे श्री. संत गजानन महाराजांची पालखी मार्गस्थ होणार आहे.

टॅग्स :BeedबीडAshadhi Ekadashiआषाढी एकादशीReligious programmeधार्मिक कार्यक्रम