आठवडी बाजार बंद व्यावसायिकांना फटका - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:58 IST2021-03-13T04:58:31+5:302021-03-13T04:58:31+5:30
अंबेजोगाई : सध्या प्रत्येकाला आपला मोबाईल जीव की प्राण झाला आहे. मोबाइल वापरणाऱ्यांची मोठी संख्या प्रत्येक कुटुंबात झाली ...

आठवडी बाजार बंद व्यावसायिकांना फटका - A
अंबेजोगाई : सध्या प्रत्येकाला आपला मोबाईल जीव की प्राण झाला आहे. मोबाइल वापरणाऱ्यांची मोठी संख्या प्रत्येक कुटुंबात झाली आहे. कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक प्रारंभीच्या काळात मोबाइल वापरत. मात्र, आता कोरोनापासून शालेय मुलांनाही ऑनलाइन अभ्यासासाठी मोबाइल देण्यात आले आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या हातात खेळण्याप्रमाणे स्मार्ट फोन फोन दिसू लागले आहेत. मोबाइलचा अतिवापरही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हा अतिवापर विविध आजारांना निमंत्रण देत असून, कान व डोळ्यांचे आजार मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत.
महागाईने सर्वसामान्य नागरिक हैराण
अंबाजोगाई : दिवसेंदिवस महागाई वाढतच चालली आहे. इंधन दरवाढीपाठोपाठ सामान्य नागरिकांना दिवसेंदिवस वाढत्या महागाईचा झटका बसू लागला आहे. इंधनाच्या दरवाढीने नागरिक हैराण झालेले असतानाच, गोडेतेल आणि डाळीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. डाळीच्या दरांनी शंभरी पार केली आहे. गेल्या दोन आठवड्यांत डाळी सरासरी पंधरा ते वीस रुपयांची वाढ झाली आहे, तर गोडतेल किलोमागे १० ते २० रुपयांनी महागले आहे.
वाहतुकीस अडथळा
अंबेजोगाई : अंबेजोगाई शहरात मुख्य रस्त्याच्या कामामुळे रिंग रोड परिसरात ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. काम बंद असले, तरी रस्ते खोदून ठेवल्याने वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होऊ लागले आहेत. यामुळे धुळीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. खोदून ठेवलेल्या या रस्त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीसोबतच अपघाताच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. खोदून ठेवलेले रस्ते तत्काळ दुरुस्त करावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश लखेरा यांनी केली आहे.
सिमेंट रस्त्याला तडे
अंबेजोगाई : अंबेजोगाई शहरातून लातूरकडे जाणारा मुख्य महामार्ग यशवंतराव चव्हाण चौक ते अंबासाखर कारखाना या सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. हा सिमेंट रस्ता सध्या वापरात आहे. या रस्त्याच्या कामाला अजून वर्षही लोटले नाही, तरीही रस्त्याला मोठमोठे तडे गेले आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी करण्यात आलेले फूटपाथ मोठ्या प्रमाणात खचले आहेत. मोठ्या रस्त्याची कमी कालावधीत झालेली ही दुरवस्था, कामाची निकृष्ट अवस्था दर्शवित आहेत.