दुचाकीने कट मारल्याच्या कारणावरुन युवकावर शस्त्राने हल्ला - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:30 IST2021-03-07T04:30:05+5:302021-03-07T04:30:05+5:30
माजलगाव : दुचाकीने कट मारल्याच्या कारणावरून युवकांमध्ये झालेल्या बाचाबाचीत एका युवकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. ही घटना ...

दुचाकीने कट मारल्याच्या कारणावरुन युवकावर शस्त्राने हल्ला - A
माजलगाव : दुचाकीने कट मारल्याच्या कारणावरून युवकांमध्ये झालेल्या बाचाबाचीत एका युवकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. ही घटना शहरातील महात्मा फुले शाळेच्या पाठीमागील रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान घडली.
सिद्धांत ज्ञानोबा धायजे व त्याचा मित्र विश्वानंद राजेश साळवे हे आपल्या दुचाकीवरून अशोक नगरकडे जात होते. यावेळी पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील अक्षय उर्फ देवा कसबे व विकास आठवे (रा. अशोक नगर) यांनी त्यांच्या गाडीने कट मारला. यावेळी सिद्धांत धायजे याने आमच्या गाडीला कट का मारला, असे अक्षय कसबे याला विचारले. यावेळी अक्षय याने सिद्धांतला थेट शिवीगाळ करत हातातील धारदार शस्त्राने उजव्या हाताच्या अंगठ्याजवळील बोटावर मारून जखमी केले. तसेच हाताच्या पोटरीवरही वार केला. दरम्यान, सोबत असणारा विश्वनाथ साळवे भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करत असताना, त्यालाही हातात दगड घेऊन त्याच्या पाठीवर व हातावर मारत अक्षयसोबत असणाऱ्या विकास आठवे याने जखमी केले. आमच्या नादाला लागलास तर जीवे मारून टाकू, अशी धमकी यावेळी अक्षय व विकास याने सिद्धांत व विश्वानंद यांना दिली. दरम्यान, सिद्धांत धायजे याच्या फिर्यादीवरून अक्षय उर्फ देवा कसबे व विकास आठवे यांच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक भास्कर राऊत हे करत आहेत.