शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
2
"56 इंचाची छाती असून, अमेरिकेपुढे झुकतात", राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
3
युक्रेनकडून रशियावर भीषण ड्रोनहल्ला, तुआप्से बंदरात घडवला मोठा विध्वंस, ऑईल टर्मिलन जळाले  
4
PM किसानचा २१वा हप्ता कधी येणार? मोठी अपडेट समोर! 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाहीत २००० रुपये
5
‘सत्याचा मोर्चा’त शरद पवारांचे विधान; शिंदे गटाचे नेते म्हणाले, “५० वर्ष सत्ता भोगली...”
6
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
7
मुंबईतील कॉन्सर्टवेळी 'मिस्ट्री मॅन'सोबत दिसली मलायका अरोरा, नेटकरी म्हणाले, "अर्जुनपेक्षा भारी..."
8
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
9
IND-W vs SA-W Final : टॉस आधी पावसाची बॅटिंग! मेगा फायनलमध्ये ५०-५० षटकांचा खेळ होणार का?
10
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
11
तंत्रज्ञानाची किमया! चित्रपट पाहत असताना...; Apple वॉचमुळे वाचला २६ वर्षीय तरुणाचा जीव
12
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
13
आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदे सेनेच्या नेत्यावर बंदूक
14
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
15
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
16
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
17
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
18
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना
19
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
20
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...

परळीची मान राज्यात उंचावेल, असे काम करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 00:01 IST

माझ्या भागातील सुशिक्षित तरु णांना रोजगार मिळवून देणारे उद्योग उभारण्यासाठी मी काम करणार असून यासाठी मला तुमचे आशीर्वाद द्या अशी साद राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा परळी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी औरंगाबाद येथील कार्यक्रमात बोलताना घातली.

ठळक मुद्देपंकजा मुंडे। औरंगाबादला स्थायिक झालेल्या परळीकरांशी संवाद; लोकनेते गोपीनाथराव मुंडेंचा वारसा चालविणार

परळी : आम्ही परळी मतदार संघातील आहोत असे सांगताना तुमची मान अभिमानाने उंचावेल असे काम करीन, परळीच्या विकासाची अनेक स्वप्ने मला साकारायची आहेत, माझ्या भागातील सुशिक्षित तरु णांना रोजगार मिळवून देणारे उद्योग उभारण्यासाठी मी काम करणार असून यासाठी मला तुमचे आशीर्वाद द्या अशी साद राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा परळी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी औरंगाबाद येथील कार्यक्रमात बोलताना घातली.पंकजा मुंडे म्हणाल्या, परळी हा अतिशय भाग्यवान मतदार संघ आहे. १९८० पासून लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी परळीचे नावलौकिक वाढविणारे काम केले. मला आता सलग तिसऱ्यांदा प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळत असून, या संधीचे सोने करीत आहे. मी परळी मतदार संघात अनेक योजना राबवून विकासाला गती दिली आहे. तीर्थक्षेत्र विकास, राष्ट्रीय महामार्ग, पंतप्रधान ग्राम सडक योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक, मुख्यमंत्री पेयजल योजना अशा योजनांच्या माध्यमातून करोडो रुपयांचा निधी आणून विकास अगदी वाडी, तांड्यापर्यंत पोहचविला आहे. परळीच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. आगामी काळात परळी मतदारसंघाचा विकास आणखी गतिमान करणार आहे. त्यासाठी मला पाठबळ देण्यासोबतच तुमचा आशीर्वादही हवा आहे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.विकासकामात अडथळे आणण्याचा प्रयत्न हाणून पाडालोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी आपल्या जनतेला तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळले. तोच वसा आणि वारसा पुढे चालवण्याचे काम मी करीत आहे. त्यात काही लोक अडथळा आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.परंतु आपल्या प्रेमाच्या ताकदीने त्यांचे प्रयत्न हाणून पाडून यशस्वी होईन आणि साहेबांच्या स्वप्नातील विकास मी प्रत्यक्षात करून दाखविन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.परळी व परिसरातील भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून औद्योगिक वसाहत उभारणार असून अनेक उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी विशेष योजना राबविणार असल्याचे त्या म्हणाल्या.यावेळी मराठवाडा विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे, दिपक ढाकणे, शिवम घुले तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :BeedबीडMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019beed-acबीडPankaja Mundeपंकजा मुंडे