नगरपालिकेच्या पाण्यावर पाणी विक्रेत्यांचा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:23 IST2021-07-01T04:23:34+5:302021-07-01T04:23:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क माजलगाव : नगरपालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या पाण्यासाठी कर भरूनही दहा दिवसाला पाणी मिळते. तर याच पाण्यावर ...

Water vendors attack municipal water | नगरपालिकेच्या पाण्यावर पाणी विक्रेत्यांचा डल्ला

नगरपालिकेच्या पाण्यावर पाणी विक्रेत्यांचा डल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क

माजलगाव : नगरपालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या पाण्यासाठी कर भरूनही दहा दिवसाला पाणी मिळते. तर याच पाण्यावर पाणी विक्रेत्याकडून लाखो रुपयांची कमाई केली जात आहे. असे असतानाही मुख्याधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शहरातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.

माजलगाव शहराला माजलगाव धरणाच्या शेजारी असलेल्या फिल्टर प्लांटवरून पाणी पुरवठा करण्यात येतो. शहरात येणाऱ्या मुख्य पाइपला

एअर पकडू नये म्हणून येथील नगरपालिकेच्या वतीने मुख्य पाइपलाइनवर एअर काढण्यासाठी अनेक ठिकाणी वॉल्व बसविण्यात आले आहेत. या वॉल्ववर पाणी विक्रेत्यांनी एक नळ काढून याद्वारे वाहनात मोठमोठ्या टाक्या भरून घेऊन जातात. याद्वारे या पाणी विक्रेत्यांना दरमहा लाखो रुपयांची कमाई होते.

माजलगाव शहरातील नागरिकांनी घेतलेल्या नळासाठी नगरपालिकेकडून कर आकारणी केली जाते. शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात कर भरत असताना त्यांना महिन्याला केवळ तीन वेळाच पाणी मिळते.

शहरातील नागरिकांना दहा दिवसांनी पाणी मिळत असल्यामुळे नागरिकांना घरी एवढ्या दिवस पुरेल एवढा साठा करणे मुश्किल होत आहे. त्यामुळे त्यांना अनेक वेळा विकत पाणी घ्यावे लागते. इदगाह मोहल्ला कॉर्नरवरील मुख्य पाइपलाइनवर एक वॉल्व्ह बसविण्यात आला होता. त्या ठिकाणी पाणी विक्रेत्यांनी नळ घेऊन याद्वारे आपल्या वाहनातील टाक्यांमध्ये पाणी भरून विक्री करीत असतात. याद्वारे ते महिन्याकाठी लाखो रुपयांची कमाई नगरपालिकेच्या पाण्यावर करताना दिसत आहे.

नगरपालिकेचे फिल्टर केलेले पाणी विक्री होत आहे. या वॉल्व्हवरील नळ बंद केल्यास शहरातील नागरिकांना दहा दिवसांनी मिळणारे पाणी सात दिवसाला मिळू शकते. दररोज येथून ४०-५० वाहनाद्वारे हजारो लीटर पाणी विक्रीला जात आहे.

-----

माजलगाव शहरातील इदगाह मोहल्ला काॅर्नरवर असलेल्या वॉल्व्हवर अनेक वाहने, टँकर भरण्यासाठी आलेले असतात. या टँकरमधील पाण्याची विक्री केली जाते. यामुळे येथील नळ तत्काळ बंद करण्यात येईल.

-विशाल भोसले, मुख्याधिकारी, माजलगाव नगरपालिका

Web Title: Water vendors attack municipal water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.