शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

२०१८ च्या लोकसंख्येआधारे टॅँकरने पाणीपुरवठा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 00:13 IST

पाण्याचे टँकर सुरू करताना २०११ ची लोकसंख्या लक्षात न घेता २०१८ ची लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा. जनावरांसाठी याच पद्धतीने पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे,असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिल्हा प्रशासनाला आदेश : आॅडिओ ब्रिजद्वारे बीड जिल्ह्यातील सरपंचांशी साधला संवाद

बीड : पाण्याचे टँकर सुरू करताना २०११ ची लोकसंख्या लक्षात न घेता २०१८ ची लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा. जनावरांसाठी याच पद्धतीने पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे,असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.गुरुवारी वर्षा निवासस्थानातून आॅडिओ ब्रिजच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी बीड जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवक, गट विकास अधिकारी यांच्यासह जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्याशी दुष्काळी उपाययोजने संदर्भात संवाद साधला.मुख्यमंत्री म्हणाले, दुष्काळी-रोहयोची कामे, तातडीच्या पाणी पुरवठा योजनांसाठी निवडणूक आचारसंहितेचा अडथळा नसून अधिकाऱ्यांनी विविध आवश्यक कामांना तातडीने मंजुरी द्यावी. अशा कामांसाठी निधीची कमतरता भासणार नाही, असेही ते म्हणाले. या बैठकीला मुख्य सचिव यु. पी. एस. मदान,पाणी पुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, जलसंधारण व रोहयोचे सचिव एकनाथ डवले उपस्थित होते.४ लाख १८ हजार जनावरेजिल्ह्यात एकूण ८५२ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. जिल्ह्यात ९ नळपाणी पुरवठा योजनांची दुरु स्ती, ११ तात्पुरत्या नळ पाणी पुरवठा योजना व ९०४ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. पिण्याच्या पाण्याच्या नळ पाणी पुरवठा योजनांची ९७.९९ लाख रुपये इतकी विद्युत देयकांची रक्कम भरण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.जिल्ह्यातील ११ तालुक्यात ६०० शासकीय चारा छावण्या सुरु आहेत. त्यामध्ये ३ लाख ८७ हजार ६१६ मोठी तर ३१ हजार २११ लहान अशी एकूण ४ लाख १८ हजार ८२७ जनावरे दाखल आहेत. जिल्ह्यामध्ये सर्व ११ तालुक्यातील दुष्काळग्रस्त १४०२ गावातील ७ लाख ८४ हजार १४३ शेतकऱ्यांना ४२८.३९ कोटी रु पयांची मदत त्यांच्या बँक खात्यात जमा केल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.सरपंचांनी मांडल्या अडचणीबीड जिल्ह्यातील अर्जुन शेंडगे, हरिभाऊ पवार, परमेश्वर राठोड, श्रीराम काकडे, तानाजी खामकर, संजय थोट, मनोहर खोमणे, जयसिंग नरवडे, विश्वनाथ घुले, उत्तम फड, भाऊसाहेब अवताडे,भगवान चोरमले तसेच वंदना काटे, रेश्मा तोडकर, संगीता पाटील, छाया कवाडे, प्रियंका काशीद, दिपा शिरसाठ, किर्ती चव्हाण, पल्लवी भुते, तारामती माने, सखुबाई सोनवणे,सुनीता जायभाय, सरीता सानप या सरपंचांनी मुख्यमंत्र्यांशी थेट संपर्क करुन आपल्या अडचणी मांडल्या.तक्रारींवर तातडीने कार्यवाही करागावासाठी जादा पाणी टँकर सुरु करणे,नव्याने टँकर सुरु करणे,विहिरींची दुरु स्ती करणे,पाण्याच्या टाकीची दुरु स्ती करणे, तलाव दुरु स्ती, नव्याने चारा छावण्या सुरु करणे,चारा छावण्यांची संख्या वाढविणे,रोहयोची कामे सुरु करणे, रोहयो कामाचे पैसे देणे, नळ पाणी पुरवठा योजनेच्या किरकोळ दुरु स्तींना तातडीने मंजुरी देणे अशा अनेक मागण्या यावेळी सरपंचांनी केल्या. या तक्र ारींवर तातडीने कार्यवाही करु न अहवाल देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी, तहसीलदार,गट विकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाºयांना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

टॅग्स :BeedबीडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसwater shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळsarpanchसरपंच