कांबळी प्रकल्पातील पाणीसाठा घटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:37 IST2021-08-28T04:37:48+5:302021-08-28T04:37:48+5:30
धानोरा-पिंपळा रस्ता दुरुस्तीची मागणी धानोरा : धानोरा-पिंपळा रस्त्याची सध्या दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. याचा ...

कांबळी प्रकल्पातील पाणीसाठा घटला
धानोरा-पिंपळा रस्ता दुरुस्तीची मागणी
धानोरा : धानोरा-पिंपळा रस्त्याची सध्या दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. याचा वाहनचालकांना त्रास होत आहे तरी रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
..
मूग, उडीद काढणी सुरू
आष्टी : तालुक्याच्या काही भागांत समाधानकारक पाऊस झाल्याने मूग, उडीद पीक पेरले होते. परंतु मध्यंतरी पावसाने ओढ दिल्याने पिकांनी माना टाकल्या होत्या. यामुळे पिकांच्या उत्पादनात घट झाली. सध्या काढणी सुरू आहे. महिला मुगाच्या शेंगा तोडताना दिसत आहेत.
...
पाऊस लांबल्याने पिके धोक्यात
कडा : कडा परिसरात पाऊस लांबल्याने पिके धोक्यात आली आहे. गेल्या आठवड्यात काही ठिकाणी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु पुन्हा पावसाने ओढ दिल्याने पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे शेतकरीवर्गात चिंतेचे सावट पसरले आहे.
....
सीना धरणात पाणी सोडण्याची मागणी
आष्टी : तालुक्याला वरदान ठरणाऱ्या सीना धरणात कुकडीचे पाणी सोडण्याची मागणी शेतकरीवर्गातून होत आहे. सीना धरणाची पाणी पातळी घटली आहे. कुकडी पाणलोटातील धरणात पाणीसाठा वाढला होता. परंतु टेलला आवर्तन न देता पुणे, नगर जिल्ह्यातच ती जिरवली तरी कुकडीचे पाणी सीना धरणात तातडीने सोडावे, अशी मागणी सीना लाभक्षेत्रातील शेतकरीवर्गातून होत आहे.
.....
आष्टी बसस्थानकात घाणीचे साम्राज्य
आष्टी : आष्टी बसस्थानकाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडले आहे. या ठिकाणी केवळ येणा-जाणाऱ्या बसची नोंद केली जाते. प्रवाशांना येथे निवारा राहिला नाही. येथील इमारत मोडकळीस आली आहे. या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तरी बसस्थानकाचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी प्रवासीवर्गातून होत आहे.