बीडमधील पाणीपुरवठा दोन दिवसांनी पुढे ढकलला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:21 IST2019-02-25T00:20:53+5:302019-02-25T00:21:46+5:30
माजलगाव येथून येणाऱ्या जलवाहिनीला गळती लागली आहे. देवडी, पिंपळनेर, जवळा, उंबरी आदी ठिकाणी याची दुरूस्ती केली जाणार आहे.

बीडमधील पाणीपुरवठा दोन दिवसांनी पुढे ढकलला
बीड : माजलगाव येथून येणाऱ्या जलवाहिनीला गळती लागली आहे. देवडी, पिंपळनेर, जवळा, उंबरी आदी ठिकाणी याची दुरूस्ती केली जाणार आहे. त्यामुळे बीड शहराला होणारा पाणीपुरवठा दोन दिवसांनी उशिरा होणार आहे. यामध्ये गांधी नगर, पुरग्रस्त कॉलनी, तेलगाव नाका, शिवाजी नगर, स्वराज्य नगर, नगर नाका, भक्ती कन्स्ट्रक्शन, शाहूनगर, बार्शी नाका, खासबाग, बालेपीर आदी भागांचा समावेश आहे. यासंदर्भात रविवारी नगर पालिकने पत्रक काढून नागरिकांना माहिती देत सहकार्य करण्याचे आवाहन उपअभियंता किरण देशमुख, राहुल टाळके, सुरपवायझर अमोल बागलाने, किसन हाडुळे आदींनी केले आहे.