बीड शहरास वर्षभरात फक्त २४ वेळा पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:23 IST2021-06-28T04:23:16+5:302021-06-28T04:23:16+5:30
पाणीपट्टी घेताना नगरपालिकेचे कर्मचारी शहरवासीयांची अडवणूक करतात, परंतु सुविधा देताना टाळाटाळ केली जाते. बीड शहरातील नागरिकांना १५ ते ...

बीड शहरास वर्षभरात फक्त २४ वेळा पाणीपुरवठा
पाणीपट्टी घेताना नगरपालिकेचे कर्मचारी शहरवासीयांची अडवणूक करतात, परंतु सुविधा देताना टाळाटाळ केली जाते. बीड शहरातील नागरिकांना १५ ते २० दिवसाला रात्री-अपरात्री पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. मागील वर्षभरात फक्त २४ वेळेस पाणी पुरवठा केला आहे. नगर परिषदेतील गलथान कारभाराचा नाहक त्रास शहरवासीयांना करावा लागत आहे. मुख्याधिकारी व पाणी पुरवठ्याचे अधिकारी बघ्याची भूमिका घेत आहेत. पाणी पुरवठा सुरळीत करून दिवसाच पाणी पुरवठा करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते अजय सरवदे यांनी जिल्हाधिका-यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. शहरात पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्याचा इशाराही त्यांंनी निवेदनाद्वारे दिला आहे.