पुलावरून पाणी; नागरिकांची कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:39 IST2021-09-04T04:39:49+5:302021-09-04T04:39:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अंभोरा : आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथून वाहणाऱ्या कांबळी नदीवर सावरगाव रस्त्यावर पूल आहे. ...

पुलावरून पाणी; नागरिकांची कसरत
लोकमत न्यूज नेटवर्क
अंभोरा : आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथून वाहणाऱ्या कांबळी नदीवर सावरगाव रस्त्यावर पूल आहे. या नदीच्या वरच्या बाजूस उंदरखेल येथे कढाणी प्रकल्प आहे. हा कढाणी प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यानंतर या नदीला नेहमी पाणी असते. पूल कमी उंचीचा असल्यामुळे या पुलावरून ग्रामस्थ व इतर गावांच्या लोकांना ये-जा करणे शक्य होत नाही.
अचानक पाऊस आल्यानंतर शेतात गेलेले गुराखी, शेतकरी यांना गावाकडे येता येत नसल्यामुळे शेतातच मुक्काम ठोकण्याची पाळी येते.
मंगळवारी झालेल्या पावसामुळे येते. वेलतुरी येथील तलाव व उंदरखेल येथील कढाणी प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. या नदीच्या पुलालगत सध्याही पाणी चालू आहे. मात्र आणखी जोराचा पाऊस झाला की पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागते. धानोरा, हिवरा, पिंपरखेड, सुलेमान देवळा, भोजवाडी, वेलतुरी, सावरगाव, गौखेल या गावांतील प्रवाशांना ये-जा करणे शक्य होत नाही. या ठिकाणी सावरगाव, वेलतुरी, गौखेल, भोजवाडी या ग्रामस्थांना कड्याकडे जायचे असेल तर या ठिकाणांहून जावे लागते. हिवरा, पिंपरखेड, धानोरा, सुलेमान देवळा येथील लोकांना सावरगावकडे पुलावरून जावे लागते. मात्र जोराचा पाऊस झाला तर या पुलावरून पाणी वाहते. यामुळे इतर गावांशी संपर्क तुटतो. सुलेमान देवळा येथील शेतकरी शेतात गेल्यानंतर अचानक दुपारी पाऊस आल्यानंतर त्यांना शेतातच पाणी ओसरेपर्यंत तिकडेच राहावे लागते. त्यामुळे या पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
...
030921\balasaheb raktate_img-20210901-wa0013_14.jpg
सुलेमानदेवळा येथे कांबळी नदीच्या पुलावरुन पाणी वहात असल्याने नागरिकांना मोठी कसरत करावी लागली.