वृद्धाश्रमास वॉशिंग मशीन, ओव्हन सुपूर्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:40 IST2021-09-04T04:40:20+5:302021-09-04T04:40:20+5:30

अंबाजोगाई : तालुक्यातील गिरवली येथील जीवन आधार भक्ती प्रेम वृद्धाश्रमास येथील गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीने शुकवारी वॉशिंग मशीन व ...

Washing machine, oven handed over to old age home | वृद्धाश्रमास वॉशिंग मशीन, ओव्हन सुपूर्द

वृद्धाश्रमास वॉशिंग मशीन, ओव्हन सुपूर्द

अंबाजोगाई : तालुक्यातील गिरवली येथील जीवन आधार भक्ती प्रेम वृद्धाश्रमास येथील गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीने शुकवारी वॉशिंग मशीन व ओव्हन भेट देण्यात आले. हा वृद्धाश्रम गेल्या पाच वर्षांपासून पवन गिरवलकर यांच्या प्रयत्नातून सुरू आहे.

आतापर्यंत २७ वृद्ध दाखल झालेले आहेत. त्यात १७ पुरुष व १० महिला असून त्यांना सकस जेवण, आरोग्य व इतर सुविधा पुरवल्या जातात. अंबाजोगाई येथील गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीने आश्रमातील वृद्धांना कपडे स्वच्छ धुण्यासाठी वॉशिंग मशीन व स्वयंपाक करताना अन्न भाजण्यासाठी ओव्हन भेट देण्यात आली.

याकामी महेश लोमटे, डॉ. निशिकांत पाचेगावकर व हंसराज देशमुख यांनी पुढाकार घेऊन वृद्धाश्रमात अत्यंत आवश्यक लागणारी या मशीन सकाळी जीवन आधार भक्ती प्रेम संस्थेचे पवन गिरवलकर यांच्याकडे सुपूर्द केली.

यावेळी रवी देशमुख, मनोज महिंद्रकर, राजेभाऊ दराडे, रावसाहेब देशमुख, दगडू लोमटे, कपिल देशमुख, वृद्धाश्रमाचे आनंद पानगावकर, पवन गिरवलकर, प्रशांत मुंडे, राजभाऊ पंडित, राहुल कराड, प्रल्हाद बिडगर, मनोज कदम, प्रा. रूपेश देशमुख, डॉ. प्रदीप सोनवणे, अजित देशमुख, सय्यद राजा, बालाजी घुले, शरद लोमटे, सौरभ कुलकर्णी, महादेव बडे, संतोष कदम, मुकुंद शेप, योगेश सोमवंशी, कुणाल लोमटे, रमेश दहीफळे, वाल्मीक मुंडे उपस्थित होते.

030921\img-20210902-wa0175.jpg

भक्तीप्रेम आश्रमास वॉशिंग मशीन व ओव्हन भेट देण्यात आली

Web Title: Washing machine, oven handed over to old age home