वारोळ्याच्या विद्यार्थ्यांची गगनभरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 11:21 PM2020-02-26T23:21:53+5:302020-02-26T23:23:39+5:30

वारोळा येथील प्राथमिक आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेल्या ऊसतोड कामगार, दुर्बल घटक, विमुक्त जाती, भटक्या जमाती व उपेक्षित वर्गातील शिक्षण घेत असलेली २४ मुलांनी २६ फेब्रुवारी रोजी जळगाव ते अहमदाबाद हवाई सफर केली.

Warola students scream | वारोळ्याच्या विद्यार्थ्यांची गगनभरारी

वारोळ्याच्या विद्यार्थ्यांची गगनभरारी

Next
ठळक मुद्दे२४ विद्यार्थी ४ शिक्षकांनी केला जळगाव -अहमदाबाद विमान प्रवास

माजलगाव : वारोळा येथील प्राथमिक आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेल्या ऊसतोड कामगार, दुर्बल घटक, विमुक्त जाती, भटक्या जमाती व उपेक्षित वर्गातील शिक्षण घेत असलेली २४ मुलांनी २६ फेब्रुवारी रोजी जळगाव ते अहमदाबाद हवाई सफर केली. तालुक्यातील सामाजिक न्याय विभागाअंतर्गत चालणारी ही आश्रमशाळा आय.एस.ओ.मानाकंन प्राप्त आहे.
आपली स्वत:ची प्रबळ इच्छा शक्ती असताना आपण शिक्षण घेऊ शकलो नाही. परंतु आपल्या पाल्यांना खूप शिकवायचे, यासाठी रात्रीचा दिवस करायचा परंतु आपल लेकरु शिकवायचे असा संकल्प करणाऱ्या पालकांचे पाल्य हवाई सफर करत आहेत. विशेष म्हणजे आश्रमशाळेच्या शैक्षणिक इतिहासात दुसऱ्यांदा ही हवाई सफर होत आहे. सध्या चालू असलेल्या प्रधानमंञी उड्डाण योजने अंतर्गत २६ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीतील सहलीत २४ विद्यार्थी व ४ शिक्षक सहभागी झाले आहेत. ही सहल वारोळा- माजलगाव - मानवत रोड रस्तामार्गाने, मानवत रोड- जळगाव (रेल्वे प्रवास) आणि जळगाव ते अहमदाबाद (विमान प्रवास) अशी जात आहे. यासहलीत अहमदाबाद गार्डन, सरदार वल्लभभाई पटेल म्युझयिम, विज्ञान भवन, साबरमती आश्रम, अक्षरधाम मंदिर, अमरनाथ मंदिर, वैष्णवी देवी मंदिर, महेदाना वॉटर पार्क, कांकरीया लेक, स्टॅचू आॅफ युनिटी, लक्ष्मी विलास पॅलेस, बडोदा या स्थळांना भेट असेल. परतीच्या प्रवासात बडोदा ते मुंबई रेल्वे प्रवास, मुंबई मंत्रालयास भेट. त्यानंतर मुंबई ते मानवत रोड (रेल्वे प्रवास), मानवत रोड-वारोळा (बस प्रवास) मार्गे ऐतिहासिक सहल संपन्न होणार आहे. शापित गरीबीचं विदारक द्वंद्वचित्र रेखाटणाºया तळागाळातील गोरगरीब मुला-मुलींच्या अभिजात स्वप्नांना उंच भरारी देत जळगाव ते अहमदाबाद अशी अनोखी हवाईयात्रा घडवण्याचे स्वप्न शाळेचे मुख्याध्यापक कचरे व्ही.पी., जाधव व्ही.आर., प्रधान एम.एम., शिंदे एस.के., कांबळे के.एच., वखरे व्ही.पी.व पालकांनी पूर्ण केले आहे. विमानातून प्रवास करणाºया या आश्रमशाळेच्या ऐतिहासिक सहलीला सहाय्यक आयुक्त डॉ.सचिन मडावी, समाज कल्याण निरीक्षक लक्ष्मण बारगजे, प्रमोद सानप तसेच संस्थेचे अध्यक्ष बाबूराव जाधव, सचिव दिलीप जाधव, जीवन पांचाळ व माध्यमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक पद्माकर तौर यांनी या अनोख्या सहलीस शुभेच्छा देत सहकार्य केले होते.

Web Title: Warola students scream

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.