शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
2
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
3
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
4
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
5
शेअर बाजाराचा बुल सुस्साट, Sensex ८० हजारांपार; Nifty १९० अंकांनी वधारला; IT स्टॉक्समध्ये खरेदी
6
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
7
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
9
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
10
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
11
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
12
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
13
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
14
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
15
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
16
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
17
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
18
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
19
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
20
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी

वाँटेड! सुदर्शन घुलेसह तिघांचे लोकेशन सांगा, बक्षीस मिळवा; एसआयटी पथकाचेही ठाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 12:09 IST

वाल्मीक कराडची चौकशी : मस्साजोग सरपंच हत्या व खंडणी प्रकरणाच्या तपासाला गती

बीड : मस्साजोग सरपंच हत्या व खंडणी प्रकरणाच्या तपासाला गती आली आहे. गुरुवारी सकाळीच एसआयटीचे पथक चौकशीसाठी केजमध्ये दाखल झाले, तर इकडे बीड शहरात वाल्मीक कराडची एका खोलीत घेऊन दिवसभर सीआयडीने चौकशी केली. तसेच हत्या प्रकरणातील सुदर्शन घुलेसह तीनही फरार आरोपींना वाँटेड म्हणून घोषित केले. माहिती देणाऱ्यांना बक्षीसही दिले जाणार आहे.

मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणासह खंडणी व मारहाण या तीन गुन्ह्यांचा तपास सीआयडी करीत आहे, तर हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्वतंत्र उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना केली. हे पथक गुरुवारी सकाळीच केजमध्ये आले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची विश्रामगृहावर चौकशी केली. तसेच इतरही काही माहिती घेतली. तर इकडे सीआयडीही खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या वाल्मीक कराडची कसून चौकशी करीत आहेत. गुरुवारी सकाळीच नाश्ता झाल्यावर कराड याला बीड शहर पोलिस ठाण्यातील एका खोलीत नेले. तेथे बंद दाराआड चौकशी करण्यात आली. सध्या बीड शहर ठाण्यात बंदोबस्तही वाढविला आहे.

आरोपीचे लोकेशन सांगा, बक्षीस मिळवाखुनासह खंडणीच्या गुन्ह्यात फरार असलेले सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे यांना वाँटेड म्हणून घोषित केले आहे. बीड पोलिसांनी या आरोपींची माहिती देणाऱ्यास बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे. तसेच नाव गोपनीय ठेवण्याचा विश्वासही दिला आहे.

वाल्मीक कराडचा दुसरा दिवसही भातावरकराड हा सध्या बीड शहर ठाण्याच्या कोठडीत आहे. त्याला भात, वरण, पोळी, भाजी असे सरकारी जेवण दिले जात आहे. परंतु, यातील केवळ भात आणि वरणच कराड हा खात आहे. पहिल्या दिवशीही त्याने भातावरच दिवस काढला होता.

योगायोग; कराड अन् पलंग सोबतचएखादा बडा नेता किंवा व्हीआयपी व्यक्तीला पोलिस कोठडीत सेवा, सुविधा पुरविल्याचे आपण अनेकदा ऐकले. आता या प्रकरणातही वाल्मीक कराड याला बीड शहर ठाण्यात आणण्यात आले. यावेळी काही तासानेच लगेच पाच पलंगही आणले. त्यातील चार पलंग हे बाहेर परिसरात तर एक पलंग हा ठाण्यात नेला. हा पलंग कराड याच्यासाठीच आणला, अशी चर्चा सुरू झाली. परंतु, गुरुवारी सकाळीच अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांनी याचा खुलासा करत हे पलंग कर्मचाऱ्यांसाठी आणल्याचे सांगितले. त्यानंतर या चर्चांना विराम मिळाला.

सुरक्षा वाढविली, कोठडीबाहेर आठ कर्मचारीकराड हा सध्या बीड शहर ठाण्याच्या कोठडीत आहे. त्यामुळे या परिसरात आणि कोठडीबाहेर सुरक्षा तैनात केली आहे. एरव्ही तीन कर्मचारी आणि एक पर्यवेक्षण अंमलदार असायचा. परंतु, आता सहा कर्मचारी आणि पर्यवेक्षण अंमलदार असणार आहेत. या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक पोलिस उपनिरीक्षक असेल. तसेच पोलिस निरीक्षक हे प्रत्येक तीन तासाला भेट देणार आहेत.

बीपी अन् शुगरच्या गोळ्या दिल्याकराड याला बीपी अन् शुगरचा त्रास आहे. पहिल्या दिवशी शासकीय डॉक्टरांनी तपासून औषधोपचार केले. त्यानंतर त्याला आता कोठडीतच गोळ्या पुरविल्या जात आहेत. गुरुवारी त्याची वैद्यकीय तपासणी झाली नाही. प्र. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय राऊत यांनीही याला दुजोरा दिला.

धनंजय देशमुख यांना पोलिस संरक्षणसरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना एक पोलिस कर्मचारी संरक्षणासाठी दिले आहेत. बाहेरगावी जाताना ते सोबत असतात. तसेच गुरूवारी एसआयटी व सीआयडी पथकाने भेट दिली नाही. मी केजला शासकीय विश्रामगृह येथे एसआयटी पथक येणार असल्याने गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास गेलो होतो. परंतु, तोपर्यंत अधिकारी आले नव्हते. म्हणून मी परत मस्साजोगला आलो, असे धनंजय यांनी सांगितले.

पोलिसांची प्रतिमा मलीन करू नयेबीड शहर ठाण्याच्या पोलिस कोठडीबाहेर सुरक्षा वाढविली आहे. तसेच ठाण्यात ये-जा करणाऱ्यांची नोंद घेतली जाते. पलंगाबद्दल गैरसमज पसरला. कोठडीचा बंदोबस्त करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मागणी केल्याने हे मुख्यालयातून देण्यात आले. एक पलंग हा महिला कर्मचाऱ्यांना दिला होता. अफवा पसरवून पोलिसांची प्रतिमा मलीन करू नये, असे आवाहन केले.- सचिन पांडकर, अपर पोलिस अधीक्षक बीड.

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणBeedबीडwalmik karadवाल्मीक कराडCrime Newsगुन्हेगारी