माजलगावात भुरट्या चोरांचा वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:27 IST2021-01-02T04:27:56+5:302021-01-02T04:27:56+5:30

अवैध वाळू उपशावर नियंत्रणाची मागणी माजलगाव : तालुक्यातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत आहे. याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष ...

Wandering thieves in Majalgaon | माजलगावात भुरट्या चोरांचा वावर

माजलगावात भुरट्या चोरांचा वावर

अवैध वाळू उपशावर नियंत्रणाची मागणी

माजलगाव : तालुक्यातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत आहे. याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा फटका पर्यावरणाला बसत असल्याचे चित्र गोदाकाठच्या नदीपात्रांमध्ये दिसत आहे. कारवाई करण्याची मागणी होत आहे.

भाजीमंडईतील कोंडी हटेना

बीड : शहरातील भाजीमंडईत प्रत्येक रविवारी आठवडी बाजार भरतो; परंतु येथील अरुंद रस्ते व अस्ताव्यस्त पार्किंगमुळे कोंडी कायम राहत आहे. पालिका अथवा पोलिसांकडून यावर कसलीच कारवाई अथवा उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. नियोजन करून ही कोंडी सोडविण्याची मागणी होत आहे.

रस्त्याची दुरवस्था

बीड : तालुक्यातील चौसाळा गावांतर्गत जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, पूर्वी हा महामार्ग होता. मात्र, बायपास झाल्यामुळे या रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Wandering thieves in Majalgaon