शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: लोकमत इम्पॅक्ट: नागरिकांना दिलासा; गोरेगाव ओबेरॉय मॉल येथील पाणी अतिरिक्त पंप लावून काढले
2
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
3
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
4
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
5
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
6
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
7
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
8
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
9
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
10
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
11
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
12
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
13
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
14
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
15
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल
16
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
17
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
18
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
19
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
20
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड

वाल्मीक कराडवर उपचार सुरू, सुरक्षेसाठी इतर रुग्णांना हलवले; सुरेश धसांनी थेटच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 20:20 IST

Walmik Karad : वाल्मीक कराड याची तब्येत बिघडली असून त्याला आता उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

Walmik Karad ( Marathi News ) : पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्या प्रकरणातील मुख्य संशयीत आरोपी वाल्मीक कराड याला कोर्टाने आणखी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनवाली. दरम्यान, कोठडीमध्ये वाल्मीक कराड याची तब्येत बिघडली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आयसीयुमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, त्याच्या सुरक्षेसाठी बाजूच्या रुग्णांना हलवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यावरुन आता भाजपा आमदार सुरेश धस यांनी संताप व्यक्त केला आहे. 

'देवाचिये द्वारी उभा क्षणभरी'; अमित शाह यांचं नाशिकमध्ये देवदर्शन, यात्रेत झाले सहभागी

 आमदार सुरेश धस म्हणाले, वाल्मीक कराड याच्या सुरक्षेसाठी बाजूच्या रुग्णांना हलवले असेल तर ते चुकीचे आहे. मी सीएस यांना विचारेन. पंचवीस रुग्णांना हलवणे चुकीचे आहे, चोवीस गोरगरीब रुग्णांचे वाटुळ करणार का?, असा सवालही आमदार सुरेश धस यांनी केला आहे. 

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची अजूनही चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. पोलिसांनी त्याला फरार घोषित केला आहे. दरम्यान, या सर्व आरोपींना मकोका लावण्यात आला आहे. तर खंडणी प्रकरणात वाल्मीक कराड यालाही मकोका लावण्यात आला आहे. 

महादेव मुंडे यांचा १५ महिन्यापूर्वी खून झाला

दरम्यान, आता आमदार सुरेश धस यांनी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणावरुन आरोप केले आहे. धस म्हणाले, महादेव मुंडे यांचा १५ महिन्यापूर्वी खून झाला आहे. त्याचा तपास लागत नाही. हा तपास एलसीबीकडे देण्यात यावा. भदाणे, केंद्र ही ठराविक पोलिसांची नावे आहेत. त्यांनाही आकाने आणून बसवले आहे, असा आरोपही आमदार धस यांनी केला. महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणी पंधरा दिवसात पोलिसांनी कारवाई केली पाहिजे.  याबाबत अधिक्षक यांच्यासोबत चर्चा केली आहे. बीड जिल्ह्यातील पोलीस पूर्ण बदनाम झालं आहे, असंही आमदार सुरेश धस म्हणाले. 

टॅग्स :walmik karadवाल्मीक कराडbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणPoliceपोलिसSuresh Dhasसुरेश धस