Walmik Karad ( Marathi News ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी तपास सुरू केला आहे. वाल्मीक कराड याला १५ दिवसांची सीआयडी कोठडी मिळाली आहे. तर विष्णू चाटे याचीही चौकशी सुरू आहे. दरम्यान, कोठडीमध्ये असलेल्या विष्णू चाटे याने काल पोलिसांजवळ मोठी कबुली दिली आहे. पवनचक्की कंपनीला दोन कोटी खंडणी मागितल्या प्रकरणी चाटे याने कबुली दिली. यामुळे आता वाल्मीक कराड याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
CM देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिपदाचा शब्द दिला आहे का?; छगन भुजबळ म्हणाले,“मला सांगितले की...”
वाल्मीक कराड याने पवनचक्कीच्या अधिकाऱ्यांसोबत फोनवर संभाषण केले होते, अशी कबुली विष्णू चाटे याने चौकशीत दिली आहे. विष्णू चाटे याच्या मोबाईलवरुन पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकी दिल्याचा आरोप केल्याचे तक्रारीमध्ये म्हटले होते. दरम्यान, आता विष्णू चाटेने याबाबत कबुली दिली आहे. याबाबतचा अहवाल सीआयडीने न्यायालयात अहवाल सादर केला आहे.
३१ डिसेंबर २०२४ रोजी वाल्मीक कराड याने पुण्यातील सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केले. त्याच दिवशी रात्री न्यायालयाने त्याला १५ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली. पहिले दोन दिवस कराड याने जोवण घेण्यास नकार दिला. अधिकाऱ्यांनी आगृह केल्यानंतर त्याने जेवण केले. दरम्यान, आता सीआयडी अधिकाऱ्यांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अन्य आरोपींना शोधण्यासाठी पथके तयार केली आहे. राज्या शेजारी असणाऱ्या रोज्यात ही पथके पाठवण्यात आली आहेत. आरोपीजवळ मोबाईल नसल्यामुळे शोधण्यात अडचणी येत आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
'देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळाला पाहिजे'
बीड येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणावर बोलताना खासदार कोल्हे म्हणाले, देशमुख यांच्या हत्येप्रकरणावर लोकांचा रोष आहे. लक्षात घेतला पाहिजे. वाईट पद्धतीने हत्या झाली आहे. या घटनेत कोणालाही पाठीशी न घालता दूध का दूध पाणी का पाणी झाले पाहिजे. एखाद्या मंत्र्यामुळे चौकशीला अडथळा येत असेल तर त्या दृष्टीने योग्य ती पाउलं उचलली पाहिजेत, असंही खासदार अमोल कोल्हे म्हणाले.
"निष्पक्ष चौकशी होईल अशी अपेक्षा आहे. पोलिस ठाण्यात बेड का आले आहेत? याची चौकशी केली पाहिजे. गुन्हेगारांना व्हिआयपी ट्रिटमेंट बाबत मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यायला हवे, असं कोल्हे म्हणाले.