Walmik Karad ( Marathi News ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने उलटले आहेत. या हत्येतील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. तर दुसरीकडे देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी पोलिसांनी आरोप पत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रानुसार वाल्मीक कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य सूत्रधार असल्याचे आरोप पत्रात म्हटले आहे. तर कराड याच्याविरोधात पुरावे मिळाल्याचे आरोप पत्रात म्हटले आहे. पाच गोपनीय साक्षीदारांनी जबाब दिले आहे, यामुळे आता वाल्मीक कराड याच्या अडचणी वाढल्या आहेत.
'संतोष देशमुख आडवा आला, तर त्याला कायमचा धडा शिकवा'; वाल्मीक कराडचा मेसेज अन् हत्या!
खंडणी, अॅट्रॉसिटी, हत्या तिनही घटनांचा आरोप पत्रात एकत्रित उल्लेख करण्यात आला आहे. २९ नोव्हेंबर रोजी सुदर्शन घुले याच्या फोनवरुन वाल्मीक कराड याने खंडणी मागितली होती. सहा तारखेला देशमुख यांचा आरोपी घुले याच्यासह वाद झाला होता, असं या आरोप पत्रात म्हटले आहे. वाल्मीक कराड याच्या विरोधातील सर्व पुरावे पोलिसांनी गोळा केले आहेत. तसेच पाच गोपनीय साक्षीदारांनी जबाब दिला आहे.
सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करताना व्हिडीओ केल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबतचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. या प्रकरणातील चौकशी करत असताना पाच महत्वाच्या साक्षीदारांची साक्ष मिळाली आहे. या साक्षीदारांच्या जबाबनंतर वाल्मीक कराड याच्याविरोधात पुरावे मिळाले आहेत. वाल्मीक कराड हाच या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचे आरोप पत्रात म्हटले आहे.
सुदर्शन घुले याने वाल्मीक कराड याला फोन केला होता. यावेळी कराड याने सुदर्शन घुले याला म्हणाला की, जो तो उठेल आणि आपल्या आड येईल तर आपण कुणालाही सोडणार नाही. सुदर्शन घुले आणि वाल्मीक कराड या दोघांमधील हा संवाद आहे. यानंतर घुले याने अवादा कंपनीत जाऊन खंडणी मागितली होती. एक साक्षीदार सुदर्शन घुले याच्यासोबत होता.
मारहाणीचा व्हिडीओ सीआयडीकडे
पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात आरोपीविरोधात पुरावे असल्याचे सांगितले आहे. यात सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडीओही मिळाल्याचे म्हटले आहे. संतोष देशमुख यांना सुदर्शन घुले मारहाण करतानाचा व्हिडीओ सीआयडीला मिळाला आहे.