शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Walmik Karad : दोन दिवसातच वाल्मीक कराडची तब्येत बिघडली, ऑक्सिजन मास्क लावला; तुरुंगात नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 11:59 IST

Walmik Karad : वाल्मीक कराड दोन दिवसापूर्वी पुण्यातील सीआयडीला शरण आला. कराड याला १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Walmik Karad ( Marathi News ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीने तपास वाढवला आहे. या प्रकरणातील मास्टरमाईंडचा आरोप असलेले वाल्मीक कराड याने पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला. त्याच दिवशी बीड न्यायालयात हजर केले, न्यायालयाने १४ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली. वाल्मीक कराड सध्या सीआयडी कस्टडीमध्ये आहे. दोन दिवसापासून वाल्मीक कराड याची तब्येत बिघडल्याचे सांगण्यात येत आहे. कराड याला रात्री ऑक्सिजन मास्क लावण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

Walmik Karad :'मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटर होऊ शकतो'; काँग्रेस नेत्याचा मोठा दावा

वाल्मीक कराड याला पहिल्या दिवशी थोडावेळ ऑक्सिजन मास्क लावावा लागला. यानंतर आता दुसऱ्या दिवशीही अर्ध्या तासासाठी ऑक्सिजन मास्क लावला. कराड याला दररोज गोळ्या सुरू आहेत. सीआयडीकडे आत्मसमर्पण होत असताना त्याने सोबत औषध आणली आहेत. वाल्मीक कराड याची सीआयडी कस्टडीमध्ये डॉक्टरांनी तपासणी केली. 

 तुरुंगात नेमकं काय घडलं?

वाल्मीक कराडने सीआयडी कोठडीत पहिल्या दिवशी जेवण घ्यायला नकार दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने नाश्ता घ्यायला नकार दिला. कराड याला शुगर आणि बीपीचा त्रास आहे. अधिकाऱ्यांनी कराड याला खाण्यासाठी आग्रह केला. यानंतर सकाळी साडे अकराच्या सुमारास जेवण केले. वाल्मीक कराड याने अधिकाऱ्यांकडे काही मागण्या केल्या आहे. त्या त्याने फक्त भात किंवा खिचडीची मागणी केली आहे. तर दोन्ही रात्री तो ऑक्सिजन मास्क लावून झोपला होता अशी माहिती समोर आली आहे.

दरम्यान, वाल्मीक कराड शरण आल्यानंतर सीआयडी अॅक्टीव्ह झाली आहे. सीआयडी आता सुदर्शन घुले याच्यासह अन्य आरोपींच्या मागावर आहे. तपासाची चक्रे वाढवली आहेत. चार राज्यात पोलिसांनी पथके पाठवली आहेत. आरोपींकडे मोबाईल फोन जवळ नसल्यामुळे शोध लागलेला नाही.

 काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा 

"मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटर होऊ शकतो, असा मोठा दावा वडेट्टीवार यांनी केला. वाल्मीक कराड याचा पोलिस एन्काऊंटर करु शकतात, असं वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. आज काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, बीड मधील पोलिस ठाण्यात बेड घेऊन गेल्याचे फोटो समोर आले. याआधी पोलिस ठाण्यात बेडवर झोपल्याची माहिती नाही. कालच्या प्रकरणात पोलिसांसाठी असल्याच सांगितलं आहे. हे वाल्मीक कराडचे लाड आहेत. पोलिस कस्टडीमध्ये असताना त्याला झोपण्यासाठी घेऊन गेले आहेत का? या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. 

टॅग्स :walmik karadवाल्मीक कराडbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणPoliceपोलिस