Walmik Karad : मागील काही दिवसांपासून परळीतील महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपीवर कारवाई करण्याची मागणी सुरू आहे. हत्येला अनेक महिने उलटूनही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेले नाही, कारवाईच्या मागणीसाठी आज परळीमध्ये आज रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी नागरिकांनी आक्रोश व्यक्त केला. तसेच यावेळी बाळा बांगर यांनी वाल्मीक कराड याच्याबाबत मोठा गौप्यस्फोट करत गंभीर आरोप केले.
आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सह २५ सॉफ्ट पॉर्न अॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
परळीतील आंदोलना दरम्यान बोलताना बाळा बांगर म्हणाले, वाल्मीक कराडधनंजय मुंडे यांच्या वाईटावर होता. धनंजय मुंडे यांना संपवून वाल्मीक कराड याला पोटनिवडणूक घ्यायची होती", असा गंभीर आरोप बाळा बांगर यांनी कराड याच्यावर केला. धनंजय मुंडे यांचे पीए प्रशांत जोशी यांना मारण्याचा कट देखील वाल्मिक कराड याने रचला होता. माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांना देखील त्रास दिला', असा गौप्यस्फोट बांगर यांनी केला.
महादेव मुंडे प्रकरणात माझ्यावर दबाव होता
"या प्रकरणात बोलू नको', असा माझ्यावर दबाव होता. पण, त्यांना मी जबाब दिल्याचे माहित नव्हतं. मी घाबरणार नाही, माघारही घेणार नाही. परळीला वाल्मिक कराडने कीड लावली. मीच फरार होतो तर मी म्हणून या प्रकरणात मला बोलायला उशीर लागला. प्रशासनाने वाल्मिक कराड आणि टोळीला अभय दिले', असा आरोपही बाळा बांग यांनी केला.
"काल माझ्या पत्नीची रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती. याबाबत मी पत्नीला विचारले तर तिने रेकॉर्डिंग व्हायरल केली नसल्याचे सांगितले. या रेकॉर्डिंग प्रकरणाची सीडीआर काढा म्हणून मी पण उपोषणाला बसणार आहे, असंही बांगर म्हणाले.