शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
4
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
5
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
6
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
7
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
8
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
9
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
10
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
11
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
12
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
13
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
14
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
15
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
16
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
17
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
18
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
19
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
20
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा

वाल्मीक कराड, सुदर्शन घुलेसह आठही आरोपींच्या गुन्ह्याची यादी मोठी; कोणावर किती गुन्हे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 14:48 IST

सर्व गुन्हेगार सराईत; मोक्का अंतर्गत कारवाई करण्याच्या हालचाली सुरू

बीड : मस्साजोग सरपंच हत्या, दोन कोटी रुपये खंडणीच्या गुन्ह्यातील वाल्मीक कराड, सुदर्शन घुलेसह इतर आठ जणांवर खंडणी, हाफ मर्डरसह इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत. सुदर्शन घुलेविरोधात यापूर्वीही अपहरण केल्याची नोंद आहे. यावरून हे सर्व गुन्हेगार सराईत असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. यामध्ये सुदर्शन घुलेसह आठ आरोपी आतापर्यंत निष्पन्न झाले आहेत. तर आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराडसह तिघांविरोधात गुन्हा दाखल आहे. या सर्व गुन्ह्यांचा तपास सध्या सीआयडी करत आहे. आतापर्यंत या दोन्ही गुन्ह्यांत आठ आरोपींना अटक केली आहे. सध्या हे सर्व सीआयडी कोठडीत असून, त्यांची चौकशी केली जात आहे. हे सराईत गुन्हेगार असल्याने त्यांच्यावर विशेष नजर ठेवली जात आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिले होते आश्वासनहिवाळी अधिवेशनात या प्रकरणावरून गदारोळ झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले होते. तसेच त्यांच्याविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचीही ग्वाही दिली होती. त्याप्रमाणे या सर्वांची गुन्हे दाखलची माहिती बीड पोलिसांनी काढली आहे. त्याप्रमाणे या गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाईच्या हालचाली पोलिसांनी सुरू केल्या आहेत.

वाल्मीक कराडला शासकीय बॉडीगार्डवाल्मीक कराडविरोधात १५ गुन्हे दाखल आहेत. असे असतानाही त्याला शस्त्र परवाना देण्यात आलेला आहे. तसेच दोन शासकीय बॉडीगार्डही आहेत. तीन महिन्यांसाठी त्याने ९ लाख ७२ हजार रुपये शुल्कही भरले होते. आता २५ जानेवारी रोजी याची मुदत संपणार होती, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

कोणावर किती गुन्हेसुदर्शन घुले - १९सुधीर सांगळे - २कृष्णा आंधळे - ६जयराम चाटे - ३महेश केदार - ६प्रतीक घुले - ५विष्णू चाटे - २वाल्मीक कराड - १५

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणwalmik karadवाल्मीक कराडBeedबीडCrime Newsगुन्हेगारी