वाजवा रे वाजवा... वर्षभरात १५ दिवसच परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:32 IST2020-12-29T04:32:35+5:302020-12-29T04:32:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : आगामी वर्षात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर या कालावधीत सकाळी ६ ते रात्री ...

वाजवा रे वाजवा... वर्षभरात १५ दिवसच परवानगी
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : आगामी वर्षात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर या कालावधीत सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीची मर्यादा राखून वाद्य वाजविण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
महाराष्ट्र शासन, पर्यावरण विभागाच्या शासन निर्णयान्वये उत्सव कालावधीत पंधरा (१५) दिवस सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत वाद्य वाजविण्यास परवानगी देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वनी प्राधिकरण तथा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी सल्लामसलत करुन दिवस निश्चित करण्याबाबत सुचना केल्या आहेत. जिल्ह्यात ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकरण कार्यालय नसल्याने पोलीस अधीक्षकांना नमूद दिवशी वाद्य वाजविण्यासाठी परवानगी देण्याबाबत अभिप्राय मागविले असता त्यांनी अनुकूल अभिप्राय सादर केला आहे.
शासन निर्णयानुसार १५ दिवसांसाठी जिल्ह्यात ध्वनी प्रदूषण नियम २००० मधील नियम ३ व ४चे तसेच ध्वनी प्रदूषण (नियंत्रण व नियमन) नियम २००० मधील अटी व शर्तीस अधीन राहून शिवजयंती (एक दिवस), ईद - ए - मिलाद (एक दिवस), डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (एक दिवस), १ मे महाराष्ट्र दिवस (एक दिवस), गणपती उत्सव ४ दिवस (२रा दिवस, ५वा दिवस, गौरी विसर्जन, अनंत चतुर्दशी), नवरात्री उत्सव (एक दिवस), दिवाळी (एक दिवस), ख्रिसमस (एक दिवस), ३१ डिसेंबर (एक दिवस), उर्वरित २ दिवस (महत्त्वाच्या कार्यक्रमांसाठी राखीव) यानुसार १ जानेवारी ते ३१ डिसेंबर कालावधीत सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीची मर्यादा राखून वाद्य वाजविण्यास परवानगी देण्यात आली आहे.