धानोरा, देवळा परिसरात पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:44 IST2021-06-16T04:44:14+5:302021-06-16T04:44:14+5:30

.. जनावरांचे बाजार सुरू करा कडा : कोरोनामुळे अनेक दिवसांपासून जनावरांचा बाजार बंद आहे. यामुळे अनेक शेतक-यांचे अर्थचक्र थांबले ...

Waiting for rain in Dhanora, Deola area | धानोरा, देवळा परिसरात पावसाची प्रतीक्षा

धानोरा, देवळा परिसरात पावसाची प्रतीक्षा

..

जनावरांचे बाजार सुरू करा

कडा : कोरोनामुळे अनेक दिवसांपासून जनावरांचा बाजार बंद आहे. यामुळे अनेक शेतक-यांचे अर्थचक्र थांबले आहे. शेळ्या, मेंढ्यांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहारही थंडावले आहेत. तरी जनावरांचे बाजार सुरू करावेत, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.

....

डोंगरगण-घाटा पिंप्री रस्ता दुरुस्तीची मागणी

कडा : आष्टी तालुक्यातील डोंगरगण-घाटा पिंप्री रस्त्यावर पावसामुळे जागोजागी खड्डे पडले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हे खड्डे बुजविले नाहीत. त्याचा वाहनचालकांंना त्रास होत आहे. तरी या रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी होत आहे.

...

संरक्षक कठडे बसविण्याची मागणी

धानोरा : आष्टी तालुक्यातील श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान ते मढी येथे जाणा-या घाटात अनेक ठिकाणी संरक्षक कठडे बसविण्यात आलेले नाहीत. मढीवरून या रस्त्याने भाविक मोठ्या संख्येने येतात. घाटात संरक्षक कठडे नसल्याने अपघाताचा धोका आहे. तरी येथे संरक्षक कठडे बसवावेत, अशी मागणी भाविकांतून होत आहे.

....

Web Title: Waiting for rain in Dhanora, Deola area