कडा शहर पोलीस ठाण्याच्या प्रतीक्षेत - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:03 IST2021-02-06T05:03:02+5:302021-02-06T05:03:02+5:30
कडा - मोठी बाजारपेठ, शाळा, महाविद्यालये, रोजची वर्दळ आणि राष्ट्रीय महामार्ग असलेल्या या गावात गेली अनेक वर्षांपासून पोलीस चौकी ...

कडा शहर पोलीस ठाण्याच्या प्रतीक्षेत - A
कडा - मोठी बाजारपेठ, शाळा, महाविद्यालये, रोजची वर्दळ आणि राष्ट्रीय महामार्ग असलेल्या या गावात गेली अनेक वर्षांपासून पोलीस चौकी आहे. पण अनेक वेळा पाठपुरावा करून देखील हा प्रश्न आडगळीला पडला असून फाईल काही पुढे ढकलत नसल्याने कडा शहर हे पोलीस ठाण्याच्या प्रतीक्षेत आहे.
लोकप्रतिनिधींनी जर या महत्त्वाच्या प्रश्नाला जोर लावला, तर नक्कीच पोलीस ठाण्याच्या प्रस्तावाला वेग येऊन प्रश्न मार्गी लागेल, असे कडा येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल ढोबळे अशी मागणी यांनी केली आहे. आष्टी तालुक्यातील कडा हे मोठ्या बाजारपेठेचे गाव असून जवळपास दररोज चाळीस गावच्या लोकांचा संपर्क असतो. कृषी उत्पन्न बाजार समिती, आठवडे बाजार, व्यापारपेठ, शाळा, महाविद्यालये, त्याच बरोबर राष्ट्रीय महामार्गावर असलेले गाव या ठिकाणी काही वर्षांपूर्वी स्वतंत्र पोलीस चौकी दिली. त्या चौकी अंतर्गत २३ गावे आहेत आणि एवढ्या गावात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सहा पोलीस कर्मचारी आहेत. या चौकीच्या ठिकाणी पोलीस ठाणे उभारावे, यासाठी सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढाकार घेऊन अनेक गावातील ग्रामपंचायतीचे ठराव घेऊन प्रशासकीय पूर्तता केली. ती फाईलही मंत्रालयात गेली. तिला जवळपास पंधरा वर्षे होत आली पण ती कोणाच्या हाताला येईना.
अडगळीत पडलेली पोलीस ठाणे उभारण्याची फाईल आता हातात येणे गरजेचे आहे. यासाठी तालुक्यातील लोकप्रतिनिधी यांनी याकडे गांभीर्याने पाहून हा प्रश्न मार्गी लावला तर नक्कीच स्वतंत्र ठाणे होऊन मनुष्यबळ वाढेल, त्याच बरोबर हक्काची सर्व सुविधायुक्त इमारत मिळून वाढत्या क्राईम रेटला आळा बसेल, यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे, अशी मागणी देखील ढोबळे यांनी केली आहे.
स्वंतत्र पोलीस ठाण्याची गरज
कडा हे मोठ्या बाजारपेठेचे गाव असून दररोज कुठे ना चोरी, मारामारी, त्यामुळे नक्कीच क्राईम रेट वाढत असून कर्मचारी कमी पडत आहेत. त्यामुळे याठिकाणी स्वतंत्र पोलीस ठाण्याची गरज आहे. शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांना भेटून पाठपुरावा करण्याबाबत निवेदन देणार असल्याचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांनी सांगितले. याबाबत आष्टीचे उपअधीक्षक विजय लगारे यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, कडा येथे स्वतंत्र पोलीस ठाणे उभारण्यासाठी तो प्रस्ताव शासनस्तरांवर असल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले.