शेतमजुरांना विमा कवचाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:33 IST2021-04-21T04:33:44+5:302021-04-21T04:33:44+5:30
रस्त्याची डागडुजी सुरू धारूर : धारूर ते आडस या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनचालक ...

शेतमजुरांना विमा कवचाची प्रतीक्षा
रस्त्याची डागडुजी सुरू
धारूर : धारूर ते आडस या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनचालक व प्रवासी वैतागले होते. रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येत होती. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात करण्यात आली असून, रस्त्याची डागडुजी सुरू झाल्याने प्रवासी समाधान व्यक्त करत आहेत.
खड्ड्यांमुळे
चालकांना अडचण
बीड : येथील बसस्थानकाचे सध्या नव्याने काम सुरू असून, आगार व स्थानकाचे काम केले जात आहे. परंतु, सद्यस्थितीत सर्वत्र खड्डेच खड्डे झाले आहेत. त्यातून मार्ग काढताना चालकांना कसरत करावी लागते. तसेच बसेसही खिळखिळ्या होत आहेत. यामुळे महामंडळाचे नुकसान होत आहे.
अंबाजोगाई शहरात पदपथावर आक्रमण
अंबाजोगाई : शहरात मुख्य रस्त्याच्या बाजूला फुटपाथ सोडण्यात आले आहेत. मात्र, या फुटपाथवर छोट्या व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. नागरिकांना फुटपाथवरून जाताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.