शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

बिल न देता कारमधून पळून जाणाऱ्या तिघांनी वेटरला फरफटत नेले, रात्रभर ठेवले ओलिस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 17:05 IST

संतापजनक! जेवणाचे बिल मागितल्याच्या रागातून वेटरचे अपहरण; भरधाव गाडीत एक किलोमीटरपर्यंत नेले फरफटत 

दिंद्रुड (बीड) : तीन मित्रांनी हॉटेलवर जेवण केले, वेटरला बिल ऑनलाइन देतो स्कॅनर घेऊन ये म्हणत गाडीत जाऊन बसले. त्यानंतर बिलाची मागणी करत गाडीजवळ आलेल्या वेटरला, बिल देण्यास नकार देत एक किलोमीटरपर्यंत फरपटत नेले. ऐवढेच नाहीतर त्यांनी वेटरला मारहाण करत रात्रभर ओलीस ठेवले. ही घटना माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस हद्दीत शनिवारी सायंकाळी घडली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, दिंद्रुड पोलीस हद्दीतील मेहकर- पंढरपूर या पालखी महामार्गावर असलेल्या एका हॉटेल मध्ये सखाराम जनार्दन मुंडे व अन्य दोघेजण जेवणासाठी चारचाकी गाडीतून आले होते. त्यांनी तेथे येथेच्छ जेवण केले. त्यानंतर वेटर शेख साहिल अनुसूद्दीन ला बिल घेऊन ये असं सांगितले. वेटरने बिल दिल्यानंतर, फोन पेचे स्कॅनर घेऊन ये म्हणत तिघेजण गाडीत जाऊन बसले. वेटर स्कॅनर घेऊन गेला असता, कशाचे बिल म्हणत तिघांनी वाद घातला. तू आम्हाला बिल का मागतोस का? म्हणत चालका शेजारी बसलेल्या एकाने वेटरला दरवाजाच्या बाहेर पकडून थेट एक किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. निर्जन ठिकाणी गाडी थांबवत तिघांनी मारहाण करत वेटरच्या खिशातील ११ हजार ५०० रुपयांची  रक्कम हिसकावून घेतली. तसेच डोळ्याला पट्टी बांधून शनिवारी रात्रभर वेटरला गाडीमध्येच ठेवले. दरम्यान रविवारी सकाळी धारूर तालुक्यातील भाईजळी शिवारात त्याला सोडून देण्यात आले. 

याप्रकरणी शेख साहिल अनुसूद्दीन या वेटरच्या फिर्यादीवरून, सखाराम जनार्दन मुंडे (रा. भाईजळी ता.धारूर) व अन्य अनोळखी दोघांच्या विरोधात दिंद्रुड पोलिसात रविवारी रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (बीएनएस) 2023 अन्वये 140 (3), 119 (1),115 (2), 351 (2),351 (3),281, 125 (ए),3 नुसार दिंद्रुड पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णाराव खोडेवाड करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड