शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
2
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
3
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
4
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
5
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
6
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
7
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
8
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
9
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
11
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
12
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
13
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
14
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
15
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
16
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
17
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
18
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
19
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
20
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान

परळी मतदारसंघात शांततेत मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 00:24 IST

विधानसभा मतदारसंघातील एकूण ३३५ मतदान केंद्रांवर सर्वत्र शांततेत मतदान झाले. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. काही ठिकाणी मतदान यंत्रणेत बिघाड झाली होते.

ठळक मुद्देपरळी विधानसभा निवडणूक : १६ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात झाले बंद

परळी : विधानसभा मतदारसंघातील एकूण ३३५ मतदान केंद्रांवर सर्वत्र शांततेत मतदान झाले. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. काही ठिकाणी मतदान यंत्रणेत बिघाड झाली होते. तेथे लगेच दुसरे मतदान यंत्र बसविण्यात आले. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यासह १६ उमेदवारांचे भवितव्य सोमवारी मतदान यंत्रात बंद झाले.या मतदारसंघात पालकमंत्री पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे यांच्यात ‘बिग फाइट’ झाली. धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांनी नाथरा येथे सकाळी मतदान करून शहर व ग्रामीण भागातील मतदान केंद्रास भेटी दिल्या. मुंडे बहीण- भावामुळे ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनलेली आहे. या मतदारसंघातून भाजपच्या पंकजा मुंडे, की राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे हे निवडून येतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे .या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीतर्फे भीमराव सातपुते हे उमेदवार होते.सकाळी ७ ते ९ दरम्यान ३ टक्के, ९ ते ११ दरम्यान १८, ११ ते १ या कालावधीत ३० टक्के, ४ वाजेपर्यंत ४७ टक्के आणि ५ वाजेपर्यंत ६२ टक्के मतदान झाले.६ वाजेपर्यंत मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी होती, शहरात सकाळी ११ नंतर पावसाने उघडीप दिल्याने मतदान केंद्रावर मतदारांची संख्या वाढली, बाहेरगावचे मतदार मोठ्या प्रमाणात आले होते. पुणे, मुंबई, औरंगाबाद येथील परळी मतदार संघाचे मतदार आले होते त्यांनी ही आपल्या मतदानाचा हक्क बजाविला. मतदान केंद्रावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता.विद्यानगर येथील सुमतीबाई गुलाबराव रणदिवे (९५ ) सुलोचना भगवानराव दगडगुंडे (९३) रा. गणेशपार परळी वैजनाथ यांनी ही मतदानाचा हक्क बजविला. येथील जि.प. कन्या शाळेतील मतदान केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यात पावसामुळे चिखल झाल्याने मतदारांची गैरसोय झाली.पंकजा मुंडे यांनी घेतले गोपीनाथगडावर जाऊन दर्शनपंकजा मुंडे यांनी मतदानाच्या आधी त्यांनी गोपीनाथ गडावर जाऊन लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. पंकजा मुंडे, मातोश्री प्रज्ञाताई मुंडे, भगिनी खा. डॉ.प्रीतम मुंडे, यशश्री मुंडे यांनी प्रथम सकाळी दक्षिणमुखी गणपती, प्रभू वैद्यनाथाला अभिषेक करून दर्शन घेतले.नाथरा येथे मतदानासाठी जाण्याआधी धनंजय मुंडे यांनी सोमवारी सकाळी वडील स्व. पंडितअण्णा मुंडे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले तसेच आईचे आशीर्वाद घेतले व दिवसाची सुरुवात केली. मतदानाला जाण्याआधी धनंजय मुंडे यांची कन्या आदिश्री हिनेही शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019parli-acपरळीPankaja Mundeपंकजा मुंडेDhananjay Mundeधनंजय मुंडे