शंभुराजे देसाई यांची माजलगावला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:22 IST2021-07-19T04:22:08+5:302021-07-19T04:22:08+5:30

या भेटी वेळी बीड जिल्ह्यातील संघटन वाढीबरोबरच अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. कोरोना संकटाच्या काळात जिल्ह्यातील शिवसेनेने केलेल्या कार्याचे ...

Visit of Shambhuraje Desai to Majalgaon | शंभुराजे देसाई यांची माजलगावला भेट

शंभुराजे देसाई यांची माजलगावला भेट

या भेटी वेळी बीड जिल्ह्यातील संघटन वाढीबरोबरच अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.

कोरोना संकटाच्या काळात जिल्ह्यातील शिवसेनेने केलेल्या कार्याचे कौतुकही राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी केले. जाधव कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस केली. शिवसेना पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांचा परिचय मंत्री देसाई यांना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी करून दिला. यावेळी मंत्री शंभुराजे देसाई यांचा जाधव कुटुंबीय, पदाधिकारी, शिवसैनिकांनी सत्कार केला. याप्रसंगी कडाजीराव जाधव, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामराजे सोळंके, माजी उपनगराध्यक्ष तुकाराम येवले, नगरसेवक अशोक आळणे, दासू बादाडे पाटील, अमोल डाके, अतुल उगले, कल्याण मोहिते, दिनेश मोहिते, सुखदेव धुमाळ, महादेव वैराळे, शुभम डाके, विठ्ठल जाधव, मुंजाबा जाधव, कदम आदींसह मोठ्या संख्येने शिवसैनिकांची उपस्थिती होती.

180721\purusttam karva_img-20210718-wa0030_14.jpg

Web Title: Visit of Shambhuraje Desai to Majalgaon