जागेच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:34 IST2021-04-01T04:34:18+5:302021-04-01T04:34:18+5:30
नेकनूर : येथील बीड परळी रस्त्यावर मुख्य ठिकाणी असलेल्या एका जागेचा अनेक वर्षांपासून वाद प्रलंबित आहे. याच वादातून ३१ ...

जागेच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी
नेकनूर : येथील बीड परळी रस्त्यावर मुख्य ठिकाणी असलेल्या एका जागेचा अनेक वर्षांपासून वाद प्रलंबित आहे. याच वादातून ३१ मार्च रोजी दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. त्यानंतर जखमींना रुग्णालयात आणण्यात आल्यानंतर त्याठिकाणीदेखील दोन्ही गटातील लोक भिडले होते. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन कारवाई केली. जखमींना बीड येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
नेकनूर येथील नुरानी चौक परिसरात बुधवारी दुपारच्या सुमारास जागेच्या वादातून दोन गटात तुंबळ मारामारी झाली. यामध्ये चार ते पाच जण जखमी झाले. यादरम्यान घटनास्थळी मोठा जमाव एकत्र आला होता. यामुळे घटनास्थळाला छावणीचे स्वरूप आले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमाव पांगवला. दरम्यान, भांडण झाल्यानंतर जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणीदेखील पुन्हा वाद झाला. त्यानंतर ठाणेप्रमुख लक्ष्मण केंद्रे यांनी रुग्णालयात धाव घेत जमाव पांगवला. यामध्ये चार ते पाच जण गंभीर असून, त्यांना पुढील उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत दोन्ही गटांतून गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.
नियम मोडल्यामुळे होणार गुन्हा दाखल
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन व जमावबंदी आदेश लागू आहेत. असे असतानादेखील दोन्ही गटातील लोकांनी एकत्र येत भांडण केले. त्यामुळे प्रशासनाकडून या दोन्ही गटातील लोकांवर जमावबंदीचे उल्लंघन व साथरोग कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
===Photopath===
310321\312_bed_20_31032021_14.jpg
===Caption===
नेकनूर पोलीस ठाणे.