किरकोळ कारणातून दोन गटात तुंबळ हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:33 IST2021-04-27T04:33:59+5:302021-04-27T04:33:59+5:30

बीड : क्षुल्लक कारणावरून भांडणाची कुरापत काढून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. ही घटना माजलगाव तालुक्यातील नाकलगाव येथे ...

Violent clashes between the two groups for minor reasons | किरकोळ कारणातून दोन गटात तुंबळ हाणामारी

किरकोळ कारणातून दोन गटात तुंबळ हाणामारी

बीड : क्षुल्लक कारणावरून भांडणाची कुरापत काढून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. ही घटना माजलगाव तालुक्यातील नाकलगाव येथे २० एप्रिल रोजी घडली. याप्रकरणी २५ एप्रिल रोजी दिंद्रुड पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या घटनेत ‘तुझी म्हैस आमच्या अंगणात कशी काय आली’ अशी भांडणाची कुरापत काढूून प्रकाश रामकिसन साबळे यांना मारहाण करण्यात आली. तसेच खोऱ्याने मारहाण केली. याप्रकरणी दिंदुड पोलीस ठाण्यात प्रकाश रामकिसन साबळे यांच्या फिर्यादीवरून अनंत किसन शेळके, बाळासाहेब किसन शेळके, किसन बाबुराव शेळके या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याच प्रकरणात किसन बाबुराव शेळके यांच्या फिर्यादीवरून परस्परविरोधी गुन्हा दाखल केला आहे. त्यांना जागेची कुरापत काढून मारहाण करण्यात आली. तसेच त्यांच्या कुटुंबाला देखील यावेळी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी तुळशीराम साबळे, प्रकाश साबळे, पंडित साबळे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Violent clashes between the two groups for minor reasons