शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
2
मिचेल स्टार्कचा 'Spark'! ट्रॅव्हिस हेडचा भन्नाट चेंडूवर उडवला त्रिफळा, Video 
3
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
4
निकालानंतर उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत जातील?; शरद पवारांचं मोठं विधान
5
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
6
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
7
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
8
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
9
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
10
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
11
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
12
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
13
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
14
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
15
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
16
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध
17
Gold Price Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोन्याचे दर पुन्हा घसरले
18
PM मोदींच्या वक्तव्यानंतर सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी, कोल इंडियाबाबत ब्रोकरेज बुलिश, म्हणाले...
19
T20 WC 2024: "रिंकू एकमेव खेळाडू आहे जो...", 'भज्जी'ने टीम इंडियासाठी सांगितली रणनीती
20
Closing Bell: शेअर बाजाराचं मार्केट कॅप $५ ट्रिलियन पार; मेटल शेअर्समध्ये तेजी, बँक-आयटी घसरले

ग्रामस्थांनी एचआयव्हीबाधित मुलाचे अंत्यसंस्कार नाकारले, बीडमधील संतापजनक घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 7:05 AM

आईला एचआयव्ही आजार. याच आजाराने त्यांचा १२ वर्षीय मुलगा मरण पावला. मात्र, समाजातील लोकांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिल्याने, शेवटी आईनेच समाजसेवी संस्थेच्या मदतीने मुलावर अंत्यसंस्कार केले.

- सोमनाथ खताळबीड : आईला एचआयव्ही आजार. याच आजाराने त्यांचा १२ वर्षीय मुलगा मरण पावला. मात्र, समाजातील लोकांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिल्याने, शेवटी आईनेच समाजसेवी संस्थेच्या मदतीने मुलावर अंत्यसंस्कार केले.मनिषा (वय ४२, नाव बदललेले) यांचा वयाच्या पंचविसाव्या वर्षी मुकादमासोबत विवाह झाला. काही दिवसांनी मनिषाला पतीने सोडले. त्यानंतर, मनिषा घराबाहेर पडून हॉटेल व इतर ठिकाणी राहून काम करू लागली. यातूनच ती गर्भवती राहिली. तिला मनोज व मोनिका (नाव बदलेली) अशी दोन मुले झाली. या दोन्ही मुलांना एचआयव्ही होता. दहा वर्षांपूर्वी मोनिकाचा मृत्यू झाला. मागील १५ दिवसांपूर्वी मनोजची प्रकृती खालावली. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी पहाटेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.पोटच्या गोळ्याचा मृतदेह डोळ्यासमोर ठेवून मनिषा गल्लीतील लोकांना अंत्यसंस्कारासाठी विनवणी करीत होती. मात्र, समाजाने मदत करण्याऐवजी नावेच ठेवली. कोणीच पुढे येत नसल्याने मनिषा खचली होती. काय करावे समजत नव्हते. अखेर दु:ख पचवून मनिषाने रिक्षा केला आणि त्यात मृतदेह घेऊन थेट पाली येथील ‘इन्फंट इंडिया’ही समाजसेवी संस्था गाठली. इन्फंटच्या ‘वेदना’ स्मशानभूमीमध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.मृतदेह घेऊन महिलाआमच्याकडे येताच सर्व कारवाई करून दफनविधी करण्यात आला. आता या आईलाही आम्ही आधार देत आहोत. सध्या इन्फंटमध्ये ६९ मुले, मुले आणि ८ महिला आहेत. या सर्वांचा सांभाळ कुटुंबातील सदस्यांप्रमाणे करत आहोत. समाजाने मानसिकता बदलून यांना आधार देण्याची गरज आहे.- दत्ता बारगजे, संचालक इन्फंट इंडिया, पाली, जि. बीड.

टॅग्स :Deathमृत्यूBeedबीड