शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
3
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
4
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
5
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
6
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
7
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
8
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
9
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
10
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
11
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
13
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
14
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
15
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
16
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
17
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
18
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
19
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
20
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?

बीडमध्ये ‘वेठबिगारी’ रॅकेट उघड; तीन वर्षांच्या चिमुकलीलाही लावले भांडी घासायला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 14:30 IST

पैशाचे आमिष दाखवून पालघरहून आणले मजूर कुटुंब, सात जणांची सुटका

बीड : पालघर जिल्ह्यातील गरीब मजुरांना पैशांचे आमिष दाखवून बीड जिल्ह्यात आणले. त्यानंतर त्यांच्या अल्पवयीन मुला-मुलींकडून घरकाम व शेतीचे काम करवून घेण्यात येत होते. अवघ्या तीन वर्षांच्या चिमुलीलाही भांडी घासायला लावले. याचा पर्दाफाश सामाजिक कार्यकर्ते तत्त्वशील कांबळे यांनी प्रशासनाच्या मदतीने केला. यात सात जणांची सुटका करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील बालमजुरांचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

पालघर जिल्ह्यातील एका व्यक्तीने तत्त्वशील कांबळे यांना कॉल करून संपर्क साधला. यात त्यांचा भाऊ, त्याची पत्नी आणि मुलांना मौजे तागडगाव येथील धर्मराज हिरामण धनवटे याने आणून बंदिस्त ठेवल्याचे सांगितले. कोणताच मोबदला न देता त्यांना परत गावी जाऊ देत नसल्याची माहिती मिळताच, तत्त्वशील कांबळे यांनी तक्रारदाराला सोबत घेऊन थेट जिल्हाधिकारी, बीड यांची भेट घेतली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या अधिकारी अनिता कदम, सरकारी कामगार अधिकारी अजय बळीराम लव्हाळे, राहुल उबाळे, तहसीलदार सुरेश घोळवे आणि शिरूर कासार पोलिस ठाण्याचे सपोनि. जाधव साहेब यांच्यासह एक पथक तातडीने तागडगाव येथे दाखल झाले.

अल्पवयीन मुलींकडून अमानवी कामपथकाने धर्मराज धनवटे यांच्या घरी तपासणी केली असता, त्यांना संबंधित मजूर आणि त्याची पत्नी व मुले घरकाम करताना आढळले. धक्कादायक बाब म्हणजे, इतर अल्पवयीन मुली मारोती ज्ञानदेव सानप यांच्या शेतात कपडे धुणे, भांडी घासणे व म्हशी सांभाळणे ही कामे करत होत्या. तसेच, नंदू ज्ञानदेव पवार यांच्या शेतातूनही एक अल्पवयीन मुलगी काम करताना ताब्यात घेण्यात आली. यामध्ये, तीन वर्षांच्या लहान मुलीलाही भांडी घासणे व म्हशी सांभाळण्याच्या कामात जुंपण्यात आले होते, हे सर्वांत गंभीर आहे.

धमक्या देऊन वेठबिगारीपीडितांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मराज धनवटे, मारोती ज्ञानदेव सानप, नंदू ज्ञानदेव पवार (सर्व रा. तागडगाव) आणि रामहारी आश्रुबा खेडकर (रा. मालेवाडी, ता. पाथर्डी) यांनी त्यांना जास्त पैशांचे आमिष दाखवून पालघर येथून आणले. मात्र, त्यांना कमी मोबदल्यात वेठबिगारीचे काम करण्यास लावले आणि गावाकडे गेल्यास जिवे मारून टाकू, अशी धमकी देत बंदिस्त ठेवले होते. पथकाने पंचनामा करून सर्व पीडितांची सुटका केली असून, तत्त्वशील बाबूराव कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चारही आरोपींविरुद्ध वेठबिगारी आणि बळजबरीने काम करवून घेण्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील वेठबिगारीचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Beed: Bonded Labor Racket Exposed; Toddler Forced into Labor

Web Summary : A bonded labor racket in Beed was exposed. Lured from Palghar, laborers, including a three-year-old, were forced into domestic and agricultural work under threat. Seven were rescued, and a case has been registered against the perpetrators.
टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्या