हनुमान चौकातील भाजीपाला बाजार उठवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:22 IST2021-06-19T04:22:52+5:302021-06-19T04:22:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धारूर : शहरात हनुमान चौकात भरणाऱ्या भाजीपाला बाजाराने व्यापारी, नागरिक त्रस्त झाले होते. हा बाजार तातडीने ...

हनुमान चौकातील भाजीपाला बाजार उठवला
लोकमत न्यूज नेटवर्क
धारूर : शहरात हनुमान चौकात भरणाऱ्या भाजीपाला बाजाराने व्यापारी, नागरिक त्रस्त झाले होते. हा बाजार तातडीने बंद करावा, अशी मागणी होत होती. अखेर नगरपरिषदेने शुक्रवारी नियोजन करून नेहमीच्या ठिकाणी नियमांचे पालन करीत बाजार भरवला.
धारूर शहरातील श्री हनुमान चौक हे गर्दीचे व व्यापारी वस्तीतील मध्यवर्ती ठिकाण आहे. या ठिकाणी जिल्हा सहकारी बँक, पोस्ट कार्यालय, महाराष्ट्र ग्रामीण बँक व इतर कार्यालये असल्याने नागरिकांची गर्दी असते. येथे गेल्या दोन महिन्यापासून भाजीपाला वितरक व इतर गाड्यावर फळ विक्रेते गर्दी करीत होते. सकाळी व संध्याकाळी होणाऱ्या गर्दीने या भागातील नागरिक, व्यापारी त्रस्त झाले होते. अखेर शुक्रवारी नगरपालिकेने या सर्व फळविक्रेते, भाजीपाला विक्रेत्यांना याठिकाणी बसण्यास मज्जाव केला. यामुळे हनुमान चौकाने अखेर मोकळा श्वास घेतला.
===Photopath===
180621\img_20210618_150207.jpg