वसुंधरा प्रतिष्ठानर्फे पोलिसांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:25 IST2021-06-02T04:25:39+5:302021-06-02T04:25:39+5:30

धारूर : येथील वसुंधरा मित्रमंडळाचे कार्यकर्ते, आडस येथील व्यावसायिक नीतेश कोपले यांच्या वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ वसुंधरा मित्रमंडळातर्फे ...

Vasundhara Pratishthan distributes masks and sanitizers to police | वसुंधरा प्रतिष्ठानर्फे पोलिसांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप

वसुंधरा प्रतिष्ठानर्फे पोलिसांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप

धारूर : येथील वसुंधरा मित्रमंडळाचे कार्यकर्ते, आडस येथील व्यावसायिक नीतेश कोपले यांच्या वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ वसुंधरा मित्रमंडळातर्फे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले. यावेळी कस्तुरबा गांधी कोविड सेंटर येथे फळवाटप, अंडीवाटप करण्यात आले. वेगळ्या पद्धतीने सामाजिक उपक्रम राबवून पुण्यस्मरण साजरे करण्यात आले. या वेळेस केजचे पोलीस उपअधीक्षक भास्करराव सावंत, पोलीस निरीक्षक सुरेखा धस, पत्रकार अतुल शिनगारे, वसुंधरा मित्रमंडळाचे अध्यक्ष रोहन हजारी, जयराज तिवारी, प्रतीक तिवारी, अश्विन गुळवे, विशाल सिरसट, आकाश तिवारी, परमेश्वर तिडके, महादू राऊत, निखिल पाथरकर, मुन्ना तांबोळी उपस्थित होते. यावेळी पोलीस उपअधीक्षक सावंत यांनी वसुंधरा मित्रमंडळाने केलेल्या कार्याचे कौतुक केले.

===Photopath===

010621\01bed_7_01062021_14.jpg

Web Title: Vasundhara Pratishthan distributes masks and sanitizers to police