चालकदिनानिमित्त विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:40 IST2021-09-17T04:40:15+5:302021-09-17T04:40:15+5:30

बीड : दळणवळण व परिवहन क्षेत्रांत वाहनचालकांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे उद्या, शुक्रवारी ‘चालक दिन’ साजरा होणार आहे. या ...

Various programs for Driver's Day | चालकदिनानिमित्त विविध कार्यक्रम

चालकदिनानिमित्त विविध कार्यक्रम

बीड : दळणवळण व परिवहन क्षेत्रांत वाहनचालकांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे उद्या, शुक्रवारी ‘चालक दिन’ साजरा होणार आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती जिल्हा ट्रक मालक-चालक असोसिएशनचे अध्यक्ष विजय काकडे यांनी दिली.

वाहनचालकांचा सन्मान व्हावा, त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी १७ सप्टेंंबर हा ‘चालक दिवस’ म्हणून साजरा करण्याचे निर्देश परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिले आहेत. चालकांना योग्य त्या सुविधा मिळाव्यात, वाहनमालकांची पिळवणूक थांबावी, यासाठी जिल्हा ट्रक मालक-चालक असोसिएशनने सतत पाठपुरावा केलेला आहे. शासन निर्देशानुसार चालक दिनाच्या निमित्ताने वाहनचालकांचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त केला जाणार आहे. पाडळसिंगी (ता. गेवराई) येथे टोलनाक्यावर हा कार्यक्रम १७ रोजी सकाळी १० वाजता होईल. यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष विजय काकडे यांनी केले आहे.

Web Title: Various programs for Driver's Day