हॉटेलचालकांसमोर विविध अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:36 IST2021-08-28T04:36:57+5:302021-08-28T04:36:57+5:30
--------------------------- पालेभाज्यांची आवक वाढली अंबाजोगाई : येथील बाजार समितीमध्ये पालेभाज्यांची आवक वाढली आहे. यामुळे दरांमध्ये थोडी फार घसरण ...

हॉटेलचालकांसमोर विविध अडचणी
---------------------------
पालेभाज्यांची आवक वाढली
अंबाजोगाई : येथील बाजार समितीमध्ये पालेभाज्यांची आवक वाढली आहे. यामुळे दरांमध्ये थोडी फार घसरण झाली आहे. किरकोळ बाजारात मात्र ग्राहकांना चढ्या दराने भाजीपाला खरेदी करावी लागत असल्याने ग्राहकांमधून नाराजीचा सूर उमटत असल्याचे दिसत आहे.
---------------------------
दुचाकीस्वार जोरात, पोलिसांचे दुर्लक्ष
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन संपुष्टात येताच सुसाट वेगाने धावणाऱ्या बेशिस्त दुचाकीस्वारांची बेफिकिरी दिसून येत आहे. वाहतूक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अपघातांची शक्यता वाढली आहे.
-----------------------------
उघडी रोहित्रे बनली धोकादायक
अंबाजोगाई : महावितरणच्या वतीने ग्रामीण भागांतील वीजपुरवठ्यासाठी शहरासह शेतशिवार व अन्य ठिकाणी रोहित्रे बसविली जातात. सुरुवातीला रोहित्राच्या पेट्या बंद असतात. मात्र या पेट्यांच्या दारांची चोरी होत असल्याने बहुतांश रोहित्राचे साहित्य उघडे पडते. यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. याकडे वीज वितरण कंपनीने तत्काळ लक्ष देऊन उघड्या रोहित्रांना पेट्या बसवून सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.