वंजारवाडी बिनविरोध ; रेवलीत होणार एका जागेसाठी निवडणूक, मोहा ,भोपळा,लाडझरी, गडदेवाडीत लक्ष्यवेधी लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:48 IST2021-01-08T05:48:55+5:302021-01-08T05:48:55+5:30
परळी : तालुक्यातील ७ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यापैकी वंजारवाडी ग्रामपंचायत बिनविरोध निघाली असून रेवली ग्रामपंचायतच्या फक्त ...

वंजारवाडी बिनविरोध ; रेवलीत होणार एका जागेसाठी निवडणूक, मोहा ,भोपळा,लाडझरी, गडदेवाडीत लक्ष्यवेधी लढत
परळी : तालुक्यातील ७ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यापैकी वंजारवाडी ग्रामपंचायत बिनविरोध निघाली असून रेवली ग्रामपंचायतच्या फक्त एका जागेसाठी निवडणूक होणार आहे. सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण १६३ पैकी ४९ जणांनी अर्ज मागे घेतले आहेत.
परळी तालुक्यातील मोहा, सरफराजपूर, वंजारवाडी, लाडझरी, भोपळा, रेवली, गडदेवाडी या सात ग्रामपंचायतींसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, मतमोजणी १८ जानेवारी रोजी होणार आहे. तालुक्यातील मोहा ग्रामपंचायत ११ जागांसाठी २५ उमेदवार (२५ माघार), गडदेवाडी ७ जागांसाठी १५ उमेदवार (१३ माघार), सरफराजपूर ७ जागांसाठी १४ उमेदवार (0 माघार), रेवली ९ पैकी ८ जागा बिनविरोध होत असून एका जागेसाठी २ उमेदवार रिंगणात आहेत. भोपळा ७ जागांसाठी १४ उमेदवार (११ माघार), वंजारवाडी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली आहे तर लाडझरीत ३ अर्ज काढून घेण्यात आले असून, ९ जागांसाठी २२ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. ७ ग्रामपंचायतच्या एकूण ५७ जागांसाठी निवडणूक होत आहे आहे. तालुक्यातील मोहा, लाडझरी, भोपळा, गडदेवाडी या गावांत चुरशीची लढत पहावयास मिळणार आहे. मोहा येथे तीन पॅनलमध्ये तर लाडझरी व भोपळा येथे दोन पॅनलमध्ये समोरासमोर लढत होणार आहे.
मोहा गावात दोन टर्म वगळता आजपर्यंत माजी खासदार स्व. गंगाधरआप्पा बुरांडे व सहकारी बापूसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली माकपचे वर्चस्व राहिले आहे. मोहा येथे माकप पुरस्कृत पॅनल विरुद्ध दोन पॅनलने लढण्याची तयारी केली आहे. लाडझरी ग्रामपंचायत निवडणुकीत सूर्यकांत मुंडे -आत्माराम चाटे व व्यंकटराव मुंडे- शिरीष नाकाडे यांच्या पॅनलमध्ये लढत होणार आहे. भोपळा गावात गावातील मुंडे विरुद्ध मुंडे पॅनलमध्ये सरळ लढत होत आहे
फोटो.. परळी तहसील कार्यालयात सोमवारी लाडझरीचे कार्यकर्ते जमले होते.