वंजारी सेवा संघ कार्यकारिणी सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:47 IST2021-01-08T05:47:14+5:302021-01-08T05:47:14+5:30
ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांना धोका बीड : आठवडाभरापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे रब्बीच्या पिकांना धोका निर्माण ...

वंजारी सेवा संघ कार्यकारिणी सत्कार
ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांना धोका
बीड : आठवडाभरापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे रब्बीच्या पिकांना धोका निर्माण झाला आहे. पावसाच्या शक्यतेने काढणी केलेली तूरही खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात रबीचे २ लाख ७९ हजार ६५३ हेक्टरवर पेरणी झाली अहे. यामध्ये ज्वारी, गहू, मका यासह तृणधान्याचा समावेश आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होत आहे. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी तर कधी अवकाळी पाऊस यामुळे हातातोंडाशी आलेले पीक जात आहे. यामुळे शेतकरी त्रस्त आहेत.
एम.एम. नवले यांना निवृत्तीनिमित्त निरोप
बीड : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प बीडमधील नेकनूर विभागामधील पर्यवेक्षक एम.एम. नवले या सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल नेकनूर विभागातील अंगणवाडी सेविकांच्या वतीने नवले यांना निरोप देण्यात आला. यासोबतच नेकनूर विभागात नवीन रुजू झालेले पर्यवेक्षक जे.एम. रणदिवे यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी ग्रा.पं. सदस्य सय्यद खालेद, सय्यद अर्शद व अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
भरधाव वाहनांमुळे अपघातात वाढ
अंबाजोगाई : शहरापासून यशवंतराव चव्हाण चौक ते अंबासाखर कारखाना हा चौपदरी रस्ता निर्माण झाला आहे. या रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहने भरधाव वेगाने चालवली जात आहेत. प्रत्येक वाहन चालक या रस्त्यावरून सुसाटपणे धावण्याची स्पर्धाच करू लागला आहे. या भरधाव वाहनांमुळे अपघात या परिसरात होऊ लागले आहेत. वाहने चालवताना वेग नियंत्रणात ठेवावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.