शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

वाल्मीक कराड म्हणाला, ‘काम बंद करा अन्यथा हातपाय तोडू’; सीआयडीच्या हाती कॉल रेकॉर्डिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 19:21 IST

मस्साजोग खंडणी प्रकरण : सीआयडीकडून आवाजाची होणार तपासणी

बीड : आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याकडे विष्णू चाटेच्या मोबाईलवरून दोन काेटी रुपयांची खंडणी मागितली. तसेच मागणी पूर्ण न केल्यास हातपाय तोडण्यासह कायमची वाट लावीन, अशी धमकी वाल्मीक कराड याने अधिकाऱ्याला दिली होती. याची कॉल रेकॉर्डिंग आता सीआयडीच्या हाती लागली असून, आवाजाची तपासणी करणे सुरू झाले आहे. यासाठी व्हाॅईस सॅम्पल घेतले जात आहेत.

सुनील केदू शिंदे (वय ४२, रा. नाशिक, ह. मु. बीड) हे मागील एका वर्षापासून आवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्याकडे केज तालुक्यातील विविध ठिकाणी पवनऊर्जा प्रकल्पाची मांडणी व उभारणीचे काम आहे. मस्साजोग याठिकाणी प्रकल्पाचे मुख्य कार्यालय आहे. २९ नोव्हेंबर रोजी शिंदे यांच्या मोबाइलवर विष्णू चाटे याने फोन केला. वाल्मीक अण्णा बोलणार आहेत, असे सांगितले. त्यानंतर ‘अरे, काम बंद करा. ज्या परिस्थितीमध्ये सुदर्शनने सांगितले आहे, त्या परिस्थितीत काम बंद करा, अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होतील, काम चालू केले तर याद राखा’, असे म्हणून प्रकल्पाचे काम बंद करण्याची धमकी दिली. त्याच दिवशी दुपारी सुदर्शन घुले कार्यालयात आला. ‘काम बंद करा अन्यथा तुमचे हातपाय तोडू’, अशी पुन्हा धमकी दिली. ‘काम चालू ठेवायचे असेल तर दोन कोटी रुपये द्या’, असे सांगितले होते.

याची सर्व कॉल रेकॉर्डिंग शिंदे यांच्या मोबाईलमध्ये झाली आहे. त्यावरून गुन्हा दाखल झाला होता. आता हीच रेकॉर्डिंग सीआयडीच्या हाती लागली आहे. तो आवाज कराड, चाटे यांचाच आहे का? यासाठी व्हाॅईस सॅम्पल घेतले जात आहेत. चाटे याचे यापूर्वीच सॅम्पल घेतले असून, कराड याचे गुरुवारी दुपारपर्यंत सॅम्पल घेतले नव्हते. तांत्रिक पुरावे जोडण्यासाठी सीआयडी काम करत असल्याचे दिसत आहे.

सरपंच हत्या प्रकरणातही दोघे आरोपीमस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातही विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले हे आरोपी आहेत. त्यातील चाटे हा सध्या खंडणीच्या प्रकरणात पोलिस कोठडीत आहे. घुले हत्या प्रकरणात अटक आहे.

कराडसोबत आलेल्यांची चौकशी?कराड हा ३१ डिसेंबर २०२४ रोजी पुण्यात शरण आला होता. यावेळी त्याच्यासोबत दोन व्यक्ती आणि पांढरी गाडी होती. ही गाडी आता सीआयडीने जप्त केली आहे. तर ज्यांची गाडी होती, ते शिवलिंग मोराळे यांनी अचानक कराड दिसल्याने आपण त्यांना वाहनातून सीआयडी कार्यालयात सोडल्याचा खुलासा केला होता. परंतु, त्यांच्यासह अन्य मदत करणारे लोकदेखील सीआयडीच्या रडारवर आहेत. त्यांचीही चौकशी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणwalmik karadवाल्मीक कराडBeedबीडCrime Newsगुन्हेगारी