शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

बीडच्या जेलमधील भांडणाचाही वाल्मीक कराडच ‘मास्टरमाईंड’; महादेव गित्तेची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 12:09 IST

या तक्रारीमुळे कारागृहात गित्ते आणि कराड गँगमध्ये राडा झाला होता, हे सिद्ध झाले आहे.

बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या वाल्मीक कराड याच्या सांगण्यावरूनच सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि त्यांच्या साथीदारांनी आम्हाला कारागृहात मारहाण केली. हा सर्व प्रकार तेथील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महादेव गित्ते, राजेश वाघमोडे यांनी कारागृह अधीक्षक यांच्याकडे तक्रारीतून केली आहे. या तक्रारीमुळे कारागृहात गित्ते आणि कराड गँगमध्ये राडा झाला होता, हे सिद्ध झाले आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड, सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि त्यांचे साथीदार हे बीडच्या कारागृहात आहेत तर परळीतील सरपंच बापू आंधळे खून प्रकरणातील बबन गित्ते गँगमधील महादेव गित्ते आणि त्याचे साथीदारही याच कारागृहात आहेत. ३१ मार्च रोजी या सर्वांना फोन लावण्यासाठी बरॅकमधून बाहेर काढले होते. यावेळी वाल्मीक कराड आणि गित्ते गँग यांच्यात शाब्दीक चकमक होऊन हाणामारी झाली होती. परंतु, कारागृह प्रशासनाने कराडचा काहीच संबंध नसल्याचे सांगत राजेश वाघमोडे आणि सुदीप सोनवणे यांच्यात वाद झाल्याचा दावा करत गुन्हा दाखल केला. परंतु, त्याच दिवशी गित्ते आणि दुसऱ्या दिवशी बीडमधील आठवले गँग इतर जेलमध्ये हलविण्यात आली होती. परंतु, आता महादेव गित्ते यांच्या तक्रारीमुळे नवा वाद निर्माण झाला असून, जेलमध्ये त्या दिवशी काय घडले? हे देखील उघड झाले आहे. दरम्यान, कारागृह अधीक्षक बक्सर मुलाणी यांना दुपारी १:५९ वाजता कॉल केला. परंतु, त्यांनी फोन न घेतल्याने बाजू समजली नाही.

काय आहे तक्रारमी आणि राजेश गायकवाड असे ३१ मार्च रोजी सकाळी बाहेर पडलो. यावेळी वाल्मीक कराड याच्या सांगण्यावरून सुदीप सोनवणे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, रघुनाथ फड, बालाजी दहिफळे, हैदर अली, लईक अली, योगेश मुंडे, जगन्नाथ फड व त्यांच्या साथीदारांनी आमच्यावर हल्ला केला. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. ते तपासून गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार बीडच्या कारागृह प्रशासनाकडे केली आहे.

टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याwalmik karadवाल्मीक कराडSantosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरणbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरण