रुई आरोग्य उपकेंद्रात दोन दिवसात ७३ जणांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:29 IST2021-04-05T04:29:39+5:302021-04-05T04:29:39+5:30
गेवराई : तालुक्यातील रुई येथील आरोग्य उपकेंद्रात कोरोना लसीकरणास सुरुवात करण्यात आली. ४५ वयापुढील नागरिकांनी लस टोचून ...

रुई आरोग्य उपकेंद्रात दोन दिवसात ७३ जणांचे लसीकरण
गेवराई : तालुक्यातील रुई येथील आरोग्य उपकेंद्रात कोरोना लसीकरणास सुरुवात करण्यात आली. ४५ वयापुढील नागरिकांनी लस टोचून घ्यावी, असे आवाहन येथील आरोग्य अधिकारी डॉ. अस्मिता पालके यांनी केले आहे.
कोरोना या संसर्गजन्य रोगाने जवळपास एक वर्षापासून थैमान घातले आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली असून, मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. निपाणी जवळका प्राथमिक आरोग्य केंद्रात व गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरण सुरू आहे. बुधवारपासून तिसऱ्या टप्प्यात तालुक्यातील सात आरोग्य उपकेंद्रात कोरोना लसीकरणास आरोग्य प्रशासनाने परवानगी दिली. त्यानंतर तालुक्यातील रुई येथील आरोग्य उपकेंद्रात कोरोना लसीकरणाचा शुभारंभ सरपंच कालिदास नवले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. अस्मिता पालके, आरोग्यसेविका शोभा बनसोडे, गटप्रवर्तक उषा बारगजे, आरोग्य पर्यवेक्षक सुधाकर गव्हाणे, एमपीडब्ल्यू नागोराव राठोड, अंगणवाडीसेविका मीना मोरे, रेखा चव्हाण, अविद्या माने, आशा स्वयंसेविका निर्मला यादव, सरस्वती बनसोडे यांची उपस्थिती होती.
भीती न बाळगता लस घ्यावी
रुई येथील आरोग्य उपकेंद्रांत कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाली आहे. बुधवार आणि गुरुवार या दोन दिवसात ७३ जणांना कोरोना लस देण्यात आली. ४५ वर्षांपुढील नागरिकांनी कुठलीही मनात भीती न बाळगता कोरोना लस घ्यावी. प्रत्येक महिन्याच्या बुधवारी गुरुवारी निपाणी जवळका प्राथमिक आरोग्य केंद्रातील डाॅ. धनंजय माने यांच्या मार्गदर्शनाखाली लस दिली जाईल. उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या गावातील नागरिकांनी लस घेण्याचे आवाहन डॉ. अस्मिता पालके यांनी केले.
फोटो ओळी : गेवराई तालुक्यातील रुई येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात ७३ वर्षीय सरस्वतीबाई सूर्यभान जगदाळे यांना पहिली कोरोना लस देऊन लसीकरणास सुरुवात झाली. यावेळी डॉ. अस्मिता पालके, ग्रामस्थ व आरोग्य कर्मचारी.
===Photopath===
040421\04bed_2_04042021_14.jpg
===Caption===
गेवराई तालुक्यातील रूई येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात ७३ वर्षीय सरस्वतीबाई सूर्यभान जगदाळे यांना पहिली कोरोना लस देऊन लसीकरणास सुरुवात झाली. यावेळी डॉ. अस्मिता पालके, ग्रामस्थ व आरोग्य कर्मचारी