चार दिवसात ५०० नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:37 IST2021-08-28T04:37:35+5:302021-08-28T04:37:35+5:30
माजलगाव शहरातील ग्रामीण रुग्णालय या ठिकाणीच केवळ लसीकरण करण्यात येत होते. एकाच ठिकाणी लसीकरण केंद्र असल्यामुळे नागरिकांना लसीसाठी तास ...

चार दिवसात ५०० नागरिकांचे लसीकरण
माजलगाव शहरातील ग्रामीण रुग्णालय या ठिकाणीच केवळ लसीकरण करण्यात येत होते. एकाच ठिकाणी लसीकरण केंद्र असल्यामुळे नागरिकांना लसीसाठी तास न् तास ताटकळावे लागत होते. त्यामुळे दररोज व्यापाराच्या माध्यमातून अनेकांशी संपर्कात येत असलेल्या व्यापाऱ्यांचे लसीकरण रखडले होते. तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र रेदासनी व पदाधिकारी गणेश लोहिया, सराफा असोसिएशनचे अध्यक्ष रामराजे रांजवण यांनी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. गजानन रुद्रवार यांना भेटून व्यापाऱ्यांसाठी वेगळे लसीकरण करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आरोग्य विभागाने मोंढ्यातील गणपती मंदिर येथे चार दिवस लसीकरण कार्यक्रम राबविला. या ठिकाणी ५०० पेक्षा जास्त व्यापाऱ्यांचे लसीकरण करण्यात आहे. लसीकरणासाठी शिक्षक संतोष लोकरे, आरोग्य विभागाच्या अंजली घोडके व स्वाती टाकसाळे यांनी परिश्रम घेतले.
270821\img_20210827_152811_14.jpg